पुणे जिल्हा माळी वधू वर सूचक मंडळाच्यावतीने वधू वर माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले . बुधवार पेठमधील संत सावतामाळी भवनमध्ये हा प्रकाशन कार्यक्रम पार पडला . यावेळी पुणे जिल्हा माळी वधू वर सूचक मंडळाचे संघटक राम झगडे , महेश जांभुळकर , संतोष रासकर , शंकुतला झगडे , संभाजी शिंदे , सुनील ढोले पाटील , महेश जांभुळकर आदी मान्यवर उपस्थित होते .
या वधू वर माहिती पुस्तिकेमध्ये श्री संत शिरोमणी सावता महाराज , महात्मा फुले , सावित्रीबाई फुले , भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांच्या रंगीत छायाचित्र असून ४५० वधू व ४०० वरांची रंगीत छायाचित्रासहित संपूर्ण माहिती देण्यात आली आहे .

