पुणे कॅम्प भागात दस्तूर मेहेर रोडवरील मेहेर मोहल्लामधील सर्वे नंबर ७७७व ७७४ रहिवाश्यांना रॉकेल व पेट्रोलचा वास असलेला पाणीपुरवठा होत आहे . गेले अनेक दिवसापासून पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या वार्ड क्रमांक आठमध्ये हा दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा नळकोंडाळ्यामधून होत असल्याने येथील रहिवाशी त्रस्त झाले आहेत .
या पाणीपुरवठ्याची तक्रार येथील महिला रहिवाश्यांनी लष्कर पाणी पुरवठा केंद्राचे उप अभियंता पांडुरंग तावडे यांना भेटून केली आहे . पुणे कॅम्प भागात एक दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे त्यामध्येच असा दुर्गधीयुक्त पाणीपुरवठा झाल्याने येथील रहिवाश्यांना अन्य ठिकाणावरून पाणी आणावे लागत आहे . अशी माहिती येथील महिला शकिला शेख , अंजली बहुले , तरन्नुम शेख , जबीन शेख , खलिपा शेख , प्रज्ञा वाघमारे , दिलशाद शेख , हुस्ना शेख मुल्ला यांनी केली आहे .

