पुणे कॅम्प भागातून सोलापूर बाजारभागातून वाहत जाणारा नवा कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे , यंदा पाऊससुद्धा कमी झाल्याने गेले अनेक दिवसापासून नव्या कालव्यामध्ये पाण्याचा प्रवाह नसल्याने हा कचरा साचत आहे , त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने डासांचे प्रमाणदेखील वाढले आहे . हा कालवा पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमधून वाहत असून कालव्याचे व्यवस्थापन महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे खात्याकडे आहे , येथील नागरिक रणजित परदेशी , महेंद्र गायकवाड , मनिष सोनिग्रा यांनी नवा कालवा स्वछ करण्याची मागणी केली आहे . या कालव्यास जाळी बसविण्याची मागणी हेमंत मुळे यांनी केली आहे
पुणे कॅम्प भागातून सोलापूर बाजारभागातून वाहत जाणारा नवा कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणावर साचला कचरा , परिसरात दुर्गंधी, डासांचे प्रमाणदेखील वाढले
Date:


