![पुणेकरांनी घेतला फूड फेस्टिवल चा आनंद](http://mymarathi.net/wp-content/uploads/2015/05/33-300x169.jpg)
पुणेकरांनी घेतला फूड फेस्टिवल चा आनंद
पुणे : दिल्लीचे चाट,उत्तरेकडील छोले-कुल्चे,रा जस्थानी सँडविच,चायनीज अशा एकाहून सरस एक पदार्थांचा आनंद ‘चांदणी चोक टू चायना’ या फूड फेस्टिवलच्या माध्यमातून पुणेकरांनी लुटला. ९ पासून १७ मे पर्यंत हॉटेल ऑरबीट येथे या फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. खवय्यांचे शहर म्हणून पुणे शहराची जगभरात ओळख आहे. अशा खाद्यप्रेमींसाठी भरवण्यात आलेले फूड फेस्टिवल एक पर्वणीच होती.
सलग ९ दिवसांपासून सुरू असलेल्या फूड फेस्टिवलमध्ये शेफ लखन सिंग यांनी वैविध्यपूर्ण डिशेसची मेजवानी लोकांना दिली. सिंग यांनी प्रथमच पुण्यात ‘चांदणी चोक टू चायना ‘ अशा वेगळ्या प्रकारच्या फूड फेस्टिवल आणले होते. यामध्ये ४० वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल होते ज्यामध्ये पाणी पुरी चे नाविन्यपूर्ण फ्लेवर्स , जलेबी-रबडी तसेच पारंपारिक खाद्य पदार्थांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश होता. त्याचशिवाय डाएट करणाऱ्यांसाठी स्पेशल डाएट चाटची व्यवस्था करण्यात आली होती.
सर्व पदार्थांची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्यातील असल्यामुळे लोकांचा यास भरघोस प्रतिसाद मिळाला. यासर्व खाद्य पदार्थांमध्ये छोले-कुल्चे यांना सर्वाधिक मागणी दिसून आली.