धृवज्योती घोष यांच्या सारंगी वादनाने जिंकली रसिकांची मने
पुणे -सांस्कृतिक पुण्यात नृत्य, गायन व वादनाच्या अनेकमैफिली होत असतात पण सारंगीची मैफील होणे म्हणजे जरा दुर्मिळच योग. परंतु, उद्गार संस्थेने आयोजित केलेल्या आवर्तन या कार्यक‘माच्या माध्यमातून ही दुर्मिळ मैफीलही पुणेकरांना अनुभवता आली. प्रसिद्ध सारंगी वादक पंडीत धृवज्योती घोष यांच्या सुरेल सारंगी वादनाने उपस्थितांची मने जिंकली. रसिक पुणेकरांच्या तुडुंब प्रतिसादात एस. एम. जोशी सभागृह येथे हीमहेफील पार पडली.
पं रोहिणी भाटे यांना मानवंदना देण्यासाठी उद्गार संस्थेच्या अध्यक्षा व प्रसिद्ध कथक नृत्यांगना डॉ सौ. आसावरी पाटणकर यांच्या संकल्पनेतून आवर्तन या अनो‘या मैङ्गलीचे आयोजन करण्यात आले होते. गायनाचा वारसा लाभलेल्या पं घोष यांच्या सुरेल सारंगी वादनाने या या कर्यक‘माची सुरूवात झाली. वरबा व श्री रागाचे सौंदर्य आपल्या सुरेल सारंगी वादनातून पं. घोष यांनी हळुवार उलगडले. परदेशातील वादक यु जी नाकागावा यांनी सारंगीच्या सहवादनातून पं. घोष यांना उत्तम साथ दिली. तर प्रसिद्ध तबलावादक अरविंदकुमार आझाद यांनी (तबला) दिलेल्या साथीने मैङ्गल आणखीनच रंगत गेली. सुरेल सारंगीप्रमाणे आपल्या सुरेल आवाजातून पं. घोष यांनी गायलेल्या जानकीनाथ सहाकरे हे भजन सादर केले. सारंगी हे खरे तर भारतीयच वाद्य परंतु, आपल्याकडील विद्यार्थी ते शिकण्यासाठी पुढे येत नाही. परदेशातील लोक मात्र हे वाद्य शिकण्यात रस घेतात याचा विचार होणे गरजेचे असल्याचे पं. घोष यांनी यावेळी सांगितले.
अपर्णा पानसे व अस्मिता चौगुले यांनी कथक नृत्याचा अविष्कार सादर केला. उठाण, तोडे, गिनती अशा विविध प्रकाराच्या साहय्याने त्यांनी कथक नृत्यातील पैलू उलगडले. दशयज्ञ या त्यांच्या नृत्यरचनेने रसिकांची मने जिंकली. आनंद देशमुख यांनी कार्यक‘माचे सूत्रसंचालन केले.