पुणे :
“महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ पी.ए.इनामदार यांची “नॅशनल कौन्सिल फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लँग्वेज् ‘ (एनसीपीयुएल) वर नियुक्ती झाली आहे. केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ही नियुक्ती केली असून, त्याचा कालावधी 3 वर्षे इतका आहे. या विषयीचे पत्र कौन्सिलचे संचालक ख्वाजा अक्रमुद्दीन यांनी पी.ए.इनामदार यांना दिले.
“महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ च्या नियामक मंडळाच्या बैठकीत या नियुक्तीबद्दल पी.ए.इनामदार यांचा सत्कार करण्यात आला. नियामक मंडळाच्या वतीने एम.सी.ई.सोसायटीचे सचिव लतिफ मगदुम यांनी पी.ए.इनामदार यांना पुष्पगुच्छ दिला. यावेळी एम.सी.ई.सोसायटीच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार, प्रा.मुझ्झफर शेख, प्रा.इरफान शेख, हाजी कदीर कुरेशी, सय्यद अली रझा इनामदार आदी उपस्थित होते.