पुणे :
पी.एम.पी.एम.एल. राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन कार्यालयाचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते झाले. हा कार्यक्रमपी.एम.पी.एल कॅन्टिन बिल्डींग, शंकरशेठ रोड येथे पार पडला.
उद्घाटनस्थळी अजित पवार (माजी उपमुख्यमंत्री) यांनी वृक्षारोपण केले तसेच पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी युनियनने अजित पवार यांचा पुणेरी पगडी देवून सत्कार केला. पी.एम.पी.एम.एल. कामगारंाचे प्रश्नाबाबत दोन्ही महापालिकेच्या आयुक्तांबरोबर चर्चा करण्याचे आश्वासन दिले.
उद्घाटन समारंभ प्रसंगी प्रशांत जगताप, सोमनाथ आप्पा शिंदे, युनियन अध्यक्ष किरण थेउरकर, सुनिल नलावडे, हरीष ओहोळ, विशाल कदम, विवेक कदम, आनंद जगताप आदी उपस्थित होते. सुनील जाधव यांनी प्रास्ताविक केले व उत्तम मोरे यांनी आभार मानले.
प्रशांत जगताप यांनी युनियनची वाटचाल व भविष्यात करण्यात येणारी कामे याविषयी कामगार मार्गदर्शन केले. कामगारांना वेतनकरारपोटी फरकाची रक्कम देण्यामध्ये प्रसंगी उपोषण करून देखिल कामगारांच्या न्याय मागण्या पुर्ण करून देऊन कामगारांना फरकापोटी रू 90 कोटीची पहिल्या टप्प्याची रक्कम आपल्या युनियनने मिळवून दिली असल्याचे सांगितले.
यावेळी पिंपरी चिंचवडच्या महापौर शंकुंतला धराडे, पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम, पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष अतुल शिरोळे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, प्रसाद शेट्टी, प्रशांत जगताप, रूपाली चाकणकर, मोहनसिंह राजपाल आदी मान्यवर उपस्थित होते.