पी.एन.जी. डायमंडच्या वतीने तीनपदरी सोन्याच्या मंगळसूत्राप्रमाणे हिर्यांचा वापर केलेले विविध कलाकुसरीच्या मंगळसूत्रांचे कलेक्शन बाजारात सादर केले आहे. हे मंगळसूत्र वजनाला हलके, आकर्षक असून त्याची किंमत ३५ हजार ते सहा लाख रुपयांदरम्यान आहे.
हे कलेक्शन प्रसिद्ध मराठी मालिका ‘होणार सून मी ह्या घरची फेम’ सेलिब्रेटी शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांनी सादर केले. यावेळी पी.एन.जी. डायमंडचे अक्षय गाडगीळ व रोहन गाडगीळ, पद्मिनी गाडगीळ, नुपूर आडकर व कल्याणी गाडगीळ उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना रोहन गाडगीळ म्हणाले, पीएनजीच्या वतीने मंगळसूत्राची चेंजओव्हर पेंडंट डिझाइन केली असून, त्यात मध्यभागी बसवलेला खडा बदलता येतो. ज्या स्त्रियांना मोठय़ा लांबीचे मंगळसूत्र घालायला आवडते, त्यांच्यासाठी पी.एन.जी. डायमंडने ‘डायमंड अटॅचमेंट’च्या स्वरूपात नवी संकल्पना सादर केली आहे. यामध्ये हिर्याच्या मंगळसूत्रात काळ्या मण्यांवर भर देण्यात आला असून त्यामुळे ते जास्त आकर्षक दिसते.
ही मंगळसूत्रे पारंपरिक असूनही वापरण्यास सोयीची आहेत. त्यामुळे नोकरदार स्त्रियांना त्याचा चांगल्या प्रकारे वापर करता येईल. हे कलेक्शन पी.एन.जी. डायमंड्सच्या लक्ष्मी रोड, पौड रोड आणि बंड गार्डन येथील दालनांमध्ये उपलब्ध आहे.