पुणे: महावितरणच्या मुळशी विभागअंतर्गत आठ गावांतील मंगळवारी (दि. 8) वीजमीटरच्या विशेष तपासणी मोहिमेत 19 लाख 77 हजार रुपयांचा अवैध वीजवापर उघडकीस आला आहे.
मुळशी उपविभाग अंतर्गत पिरंगुट, भुगाव, भुकुम, मान, मारुंजी, लवळे, उरवडे, कासार आंबोली या गावांत 171 ग्राहकांच्या वीजमीटरची तपासणी करण्यात आली. यासाठी अभियंता, जनमित्र यांची 14 पथके तयार करण्यात आली होती. महावितरणच्या पथकांनी केलेल्या तपासणीत 34 ठिकाणी 8 लाख 77 हजार 390 रुपयांची वीजचोरी आढळून आली. यात घरगुती, वाणिज्यिकसह दोन औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. तसेच 31 ठिकाणी ठिकाणी 11 लाख रुपयांच्या विजेचा अनधिकृत वापर आढळून आला. वीजचोरी प्रकरणी कलम 135 अन्वये तर अनधिकृत वीजवापर प्रकरणी कलम 126 अन्वये कारवाई करण्यात येत आहे.
पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे, पुणे ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता श्री. सुनील पावडे हे या तपासणी मोहिमेत सहभागी झाले होते. या तपासणी मोहिमेत नादुरुस्त व सदोष मीटर दिसून आले ते बदलण्यात आले. तसेच ज्या मीटरचे रिंडींग घेतले जात नव्हते अशा मीटरचे रिंडींग घेण्यात आले. यात महावितरणला 10 लाख 73 हजार रुपयांचा महसुल मिळणार आहे.
या मोहिमेत कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्ग पवार, उपकार्यकारी अभियंता सर्वश्री किरण सरोदे, कल्याण गिरी, राहुल डेरे, राजेंद्ग भुजबळ, सहाय्यक अभियंता प्रसाद दिवाण, दिनेश फुलझेले, हर्षद कुलकर्णी, प्रदीप गजरे, सुनील गटकुल, नितीन काळे आदींसह 56 कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.


