नांदेड फाटा, नऱ्हे भागात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा
पुणे : महावितरणच्या पर्वती विभागातील खडकवासला २२/११ केव्ही उपकेंद्रातील १० एमव्हीए क्षमतेचे रोहित्र (पाॅवर ट्रान्सफाॅर्मर) आज (दि. ११)दुपारी सव्वाचार वाजता नादुरुस्त झाले. त्यामुळे नांदेड फाटा, वडगाव, धायरी व नऱ्हे या गावातील वीजपुरवठा विस्कळीत झाला. तथापि, रात्री ८ वाजेपर्यंत नांदेड फाटा भागातील काही परिसर वगळता उर्वरित सर्व भागात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. दरम्यान, खडकवासला उपकेंद्रातील राेहित्र दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे.