पुणे, ’राजहंस’ प्रकाशनच्या वतीने डॉ. आशुतोष जावडेकर यांच्या ‘लयपश्चिमा’ या पुस्तकाचे प्रकाशन सुप्रसिध्द अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. येत्या रविवारी (ता. २५) सकाळी साडेदहा वाजता मयूर कॉलनीतील बाल शिक्षण मंदिरात हा कार्यक‘म होणार आहे.
पाश्चात्य जनसंगीताचा पॉप, रॉक, कंट्री, हिप हॉप आदी संगीतप्रकारांचा वेध या पुस्तकात घेण्यात आला आहे. हे संगीतप्रकार म्हणजे केवळ कानंावर पडणार्या सुरावटी नसून, त्या पाश्चात्य संस्कृतीच्या प्रवासातील वेगवेगळ्या पाऊलखुणा आहेत. संगीताची समाजाशी असलेली सांगड दाखवणारे आणि बेदरकार जगणार्या आणि गाणार्या माणसांच्या प्रतिभेतून हे संगीतप्रकार साकारले आहेत. मायकेल जॅक्सन-रिकी मार्टिनपासून मडोना-शकिरापर्यंतच्या कलाकारांच्या रंगीबेरंगी स्वरचित्रांना शब्दांतून ‘लयपश्चिमा’मध्ये रेखाटण्यात आले आहे. या संगीतप्रकारांचा वेध घेणारा दृक-श्राव्य कार्यक‘म डॉ. जावडेकर यावेळी सादर करणार आहेत.


