पार्टिसिपेटरी बजेटसाठी कामे सूचवा : सेव्ह पुणे इनिशिएटिव्हचे आवाहन
पुणे :
लोकसहभागातून अंदाजपत्रक संकल्पनेनुसार नागरिकांनी सुचविलेल्या कामांसाठी निधी उपलब्ध होणार असल्याने नागरिकांनी प्रभागांमध्ये पालिकेच्या माध्यमातून होऊ शकणारी कामे सुचवावीत, असे आवाहन ‘सेव्ह पुणे इनीशिएटिव्ह’ चे अध्यक्ष दीपक बिडकर आणि सचिव ललित राठी यांनी केले आहे. नागरिकांकडून त्यांच्या प्रभागातील कामे सुचवावित असे यात म्हणले आहे.
याबाबत विशिष्ट नमुन्यातील अर्ज प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाकडे कार्यालयीन दिवशी व कार्यालयीन वेळेत दि. 10 सप्टेंबर 2015 ते 30 सप्टेंबर 2015 पर्यंत विनामूल्य वाटपाकरिता उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे अर्ज महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरही (www.punecorporation.org) उपलब्ध आहे. सदर अर्ज दि. 30 सप्टेंबर 2015 रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील, असे पालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
या प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढला पाहिजे, यासाठी ‘सेव्ह पुणे इनिशिएटिव्ह प्रयत्नशील आहे.’