मुंबई – डाव्या चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि पुरोगामी विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणानंतर शिवसेनेने पुन्हा आपणच सहभागी झालेल्या सरकारला पिंजऱ्यात उभे केले आहे. या निर्घृण हल्ल्याची जबाबदारी कोणी घ्यायची ? असा सवाल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून करण्यात आला आहे. सध्या भाजप आणि शिवसेनेमधील संबंध मंत्र्यांच्या अधिकारांवरून ताणले गेले आहेत. त्यात या प्रकरणानंतर गृहखाते भाजपकडे असल्याने शिवसेनेने सरकारवर हल्ला करत अप्रत्यक्षपणे भाजपवरच हल्ला चढवला आहे.
सामना वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आलेल्या या अग्रलेखात असे म्हटले आहे की, कोल्हापूर उजळवून टाकत असतानाच हा अंधार झाला. हे सर्व आपल्या महाराष्ट्रात घडत आहे व सरकार बदलले तरी तेच घडत आहे. दाभोलकरांची हत्या झाली तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते व दाभोलकरांच्या खुनावरून त्या सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले होते. आता दिवसाढवळ्या झालेल्या पानसरे यांच्यावरील निर्घृण हल्ल्याची जबाबदारी कोणी घ्यायची? महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचे साफ धिंडवडे निघाले आहेत व गुन्हेगार मोकाट सुटले आहेत असे बोंबलावे तर सरकार आपलेच आहे, पण आज दुसरे एखादे सरकार असते तर त्यांना याच शब्दांनी बेदम चोपले असते. गोविंद पानसरे हे डाव्या चळवळीचे जुनेजाणते नेते आहेत.वयोवृध्द नेते . ते नि:शस्त्र होते. अशा नि:शस्त्र व्यक्तीवर व त्यांच्या वृद्ध पत्नीवर हल्ला करणे हे षंढपणाचे लक्षण
आहे.
पानसरे हल्ला प्रकरणी ,शिवसेनेची राज्यसरकारवर टिका
Date: