कोल्हापूर- पुरोगामी नेते कॉ. गोविंद पानसरे (७८) यांच्यावर सोमवारी सकाळी दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी जवळून गोळ्या झाडल्या. त्यांची प्रकृती गंभीर आहे. या वेळी खाली कोसळलेल्या उमा पानसरे (७०) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळीच या प्रकरणी पाच संशयितांना अटक केली आहे. पानसरे पत्नीसह सकाळी फिरायला गेले होते. शिवाजी विद्यापीठ परिसरातून घराकडे परतत असताना प्रतिभानगरजवळ आयडियल कॉलनीच्या दिशेने पानसरे यांच्या बंगल्यासमोरून येणाऱ्या रस्त्यावर दुचाकीवर आलेल्या दोघांनी पानसरेंना गोळ्या घातल्या. सहापैकी तीन गोळ्या पानसरेंच्या शरीरात घुसल्या. ते रक्तबंबाळ होऊन कोसळले. या धक्क्याने उमा पानसरेही कोसळल्या. पानसरे यांच्यावर दिवसभरात तीन शस्त्रक्रिया करून गोळ्या काढण्यात आल्या. यातील एक गोळी मानेत, तर दुसरी छातीच्या डाव्या बाजूला व तिसरी गुडघ्याखाली होती. या शस्त्रक्रिया व्यवस्थित झाल्या असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉ. उल्हास दामले यांनी सांगितले. उमा यांच्या डोक्याला मार लागला असल्याने मेंदूत थोडा रक्तस्राव झाला होता. त्यांच्यावरही शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्या उपचाराला पडल्याचे पाहिल्यावर तातडीने त्यांना जवळच्या अॅस्टर आधार इस्पितळात दाखल करण्यात आले. पानसरे यांच्यावर तीन शस्त्रक्रिया करून गोळ्या काढण्यात आल्या. यातील एक गोळी मानेत, तर दुसरी छातीच्या डाव्या बाजूला तिसरी गुडघ्याखाली होती. या शस्त्रक्रिया व्यवस्थित झाल्या असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉ. उल्हास दामले यांनी सांगितले. उमा यांच्या डोक्याला मार लागला असल्याने मेंदूत थोडा रक्तस्राव झाला होता. त्यांच्यावरही शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्या उपचाराला प्रतिसाद देत असल्याचे डॉक्टर म्हणाले.

