पुणे -पाथर्डी तालुक्यातील जवखेडे येथे दलितांच्या वस्तीवर अमानुषरित्या घाला घालून तीन दलितांची हत्या करण्याच्या कृतीचा पतित पावन संघटना पुणे शहरच्यावतीने जाहीर निषेधार्त आंदोलन शहरातील लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौकात जाहीर निदर्शने करण्यात आली . दलित हत्याकांडाचा जाहीर निषेध असो … अटक करा अटक करा दलितांवर अत्याचार करणाऱ्यान अटक करा , अशा घोषणा देऊन पतित पावन संघटनेचे सर्व कार्यकर्ते बेलबाग चौकात उतरले होते . यावेळी पतित पावन संघटना पुणे शहर अध्यक्ष राजाभाऊ पाटील , उपाध्यक्ष विक्रम मराठे , प्रविण झंवर , कार्याध्यक्ष धनंजय क्षीरसागर , सरचिटणीस मनोज पवार , विशाल गालफाडे , राम मोरे , गुरु कोळी , कुमार पंजावर , शशिकांत तोडकर , ओंकार चव्हाण , गणेश लडकत , अक्षय राउत , शशी कवडे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते .
यावेळी पतित पावन संघटना पुणे शहर अध्यक्ष राजाभाऊ पाटील यांनी सांगितले कि , नगर जिल्ह्यात वारंवार दलित बांधनावर अन्याय आणि अत्याचार होत आहे , त्यासाठी हे अत्याचार थांबवण्यासाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना करण्याची मागणी करण्यात आली . तसेच पतित पावन संघटना पुणे शहर उपाध्यक्ष प्रविण झंवर यांनी सांगितले कि , या अन्याय अत्याचार करणाऱ्याविरोधात अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही , या तपासाबाबत होत असणाऱ्या दिरंगाईची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली .