भवानी पेठ मधील भवानी पेठ पालखी विठ्ठल मंदिरात पहाटेच्या काकड आरतीचे सूर घुमत असल्याने पहाटेचे वातावरण भक्तिमय व प्रसन्न होत असून, दीपावलीच्या सणात रंग भरले जात आहेत. येथील संत सावतामाळी भजनी मंडळाचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी कोजागरी पौर्णिमा ते कार्तिकी पौर्णिमा या कालावधीत सर्वच ठिकाणी या आरतीचे आयोजन होत असल्यामुळे फार पूर्वीपासून होत असलेल्या या काकडारतीला विशेष महत्त्व असल्याचे वारकरी संप्रदायातील काही जाणकरांकडून सांगण्यात येते.विठ्ठल मंदिरात संत सावतामाळी भजनी मंडळाची काकडारती झाली . यावेळी सर्वाच्या कपाळाला चंदनाची उटी आणि बुक्का लाऊन स्वागत करण्यात येत होते . यावेळी मंदिरातील विठ्ठल रुक्मिणीस तुळशी फुलांचे हार घालून सजावट करण्यात आली होती .
यामध्ये विणेकरी दीपक चव्हाण , मंडळाचे अध्यक्ष ज्ञानोबा घोड , टाळकरी नंदकुमार जगताप , दत्तात्रय घोड , पंढरीनाथ कोंढरे , राहुल कोंढरे , अशोक साळुंके , चंद्रशेखर चिंचवडे , गुलाबराव जगताप , सुधीर पाटील , प्रमोद बेंगरूट , दत्तात्रय गोळे , महिला भजनकरी ताराबाई बेंगरूट, चंद्रकला भोसले , ताराबाई क्षीरसागर , कुंदा बेंगरूट , छाया कोलते , शशिकला राउत , ज्योती कोंढरे , सरस्वती ढमाले , उज्वला कोरे , मयुरी कोंढरे , अश्विनी कोंढरे आदी सहभागी झाले होते .
या काकडारतीमध्ये तुझीआण वाहिण गा देवराया …. , बहु आवडीसी जीवा पासोनिया । कर जोडोनी विनविता तुम्हा । तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा …. , करुनी विनवणी पापी ठेवितो माथा । परिसावी विनंती माझी पंढरीनाथ तारा … या अभंगाचे गायन करण्यात आले . शेवटी सर्वाना प्रसाद देण्यात आला .