जैन धर्मियांचे सर्वात पवित्र असणारे ” पर्युवशषन पर्व ” सुरु झाल्याने वीतराग जैन ग्रुपतर्फे सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील चोवियार हाऊस (सूर्यास्तपूर्वचे भोजन )सुरु केले आहे . पुणे लष्करमधील भोपळे चौकातील श्री जैन श्वेतांबर राजस्थान समाज ट्रस्टच्या राजस्थान भवनमध्ये सुरु करण्यात आलेले चोवियार हाऊसचे सुरू करण्यात आले . यावेळी वीतराग जैन ग्रुपचे अध्यक्ष सुरेश ओसवाल , मनोज छाजेड , उमेश सिंघवी , गिरीष शहा , सुनील रांका आदी मान्यवर उपस्थित होते . यावेळी चोवियार हाऊसमध्ये सूर्यास्तपूर्वचे भोजन करण्यासाठी येणारे जैन बांधवाना भोजनाचा लाभ घेतला . तसेच जैन बांधवानी भोसरी येथील पुणे पांजरपोळ ट्रस्टसाठी जीवदया दान पेटीत सढळ हाताने आर्थिक मदत दिली .
येत्या १६ सप्टेंबर २०१५ पर्यंत चोवियार हाऊस (सूर्यास्तपूर्वचे भोजन )सुरु राहणार आहे . यामध्ये जैन बांधवाना सात्विक भोजन जैन शास्त्राप्रमाणे देण्यात येणार आहे अशी माहिती उमेश सिंघवी यांनी दिली . यावेळी जैन बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सूर्यास्तपूर्वचे भोजन केले .


