पर्यावरणपूरक विकासासह आनंदी मानवी जीवनाचे उद्दीष्ठ ठेवा’ : महेश झगडे
पुणे :
‘अभियंते हेच भविष्य घडविणारे नगर रचनाकार असल्याने पृथ्वी या ग्रहाची काळजी घेण्यापासून पर्यावरणपूरक विकास करून आनंदी मानवी जीवन घडविणे हे आव्हान त्यांच्यापुढे आहे,’ असे प्रतिपादन पुणे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट आथॉरिटी (पीएमआरडीए) चे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे यांनी केले.
‘नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ स्टुडंट्स प्लॅनिंग’ तर्फे 17 व्या वार्षिक ‘अभ्युदय’ या राष्ट्रीय परिषदेच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.
समारोप कार्यक्रमात ‘नगर नियोजन, मास्टर प्लॅन निर्मिती स्पर्धा, मॉडेल निर्मिती स्पर्धा, प्रश्नमंजुषा आदी स्पर्धांमधील विजेत्या संघाना महेश झगडे आणि नगरनियोजन तज्ज्ञ रामचंद्र गोहाड यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. अध्यक्षस्थानी डॉ.पी.एम.रावळ हे उपस्थित होते.
या सर्व स्पर्धांमध्ये ‘स्कूल ऑफ प्लॅनिंग अॅण्ड आर्किटेक्चर’ (भोपाळ) ने प्रथम क्रमांक पटकावला तर ‘एम.ए.एन.ई.टी महाविद्यालय’ (भोपाळ) ने द्वितीय क्रमांक, ‘स्कूल ऑफ प्लॅनिंग अॅण्ड आर्किटेक्चर’ (दिल्ली) तृतीय आणि ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरींग’(पुणे) ला चौथ्याक्रमांकाचे पारितोषिक मिळाले. या परिषदेत देशभरातील 18 महाविद्यालयातून 700 विद्यार्थी सहभागी झाले होते.
महेश झगडे म्हणाले, ‘शहरीकरण वाढत असताना भविष्यात 70 टक्के लोकसंख्या शहरात राहण्याची शक्यता आहे. अशावेळी राहण्यायोग्य नगररचना, उर्जा वाचविणारा विचार, पर्यावरणपूरक विकास आणि मानवी आनंद वाढविणारे नियोजन करणे हे कल्पक अभियंत्यां
पुढील आव्हान ठरणार आहे.’
‘पीएमआरडीए च्या रूपाने आम्ही नगररचनेतील एक ‘रोल मॉडेल’ उभे करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यात युवा, विद्यार्थी अभियंत्यांच्या नव्या कल्पना, सहभागाला आम्ही प्रोत्साहन देऊ.’ असेही ते पुढे म्हणाले.
डॉ.अब्दुल रझाक यांनीही मनोगत व्यक्त केले.
परिषदेच्या विद्यार्थी संयोजन समितीमध्ये डॉ. प्रताप रावळ, आकांशा नरोडे, संयुक्ता पगारे, राज मुछाल, अक्षय उकीर्डे, संकेत पगारे, ऐश्वर्या जयस्वाल, प्रियांका कदम यांचा समावेश होता.
डॉ. डी.एस.मेश्राम (अध्यक्ष, आय.टी.पी.आय), अरुण पाथरकर, डॉ. बी.बी. अहुजा (संचालक, ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरींग’) बी.एन. चौधरी (उपसंचालक, ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरींग’), एस. एल. पाटील आदी मान्यवर समारोेप प्रसंगी उपस्थित होते.
दि. 21 ते 24 डिसेंबर 2015 या दरम्यान आयोजित या राष्ट्रीय परिषदेची ‘स्मार्ट सिटीकडे जाताना’ ही मध्यवर्ती संकल्पना असून, परिषदेचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योगपती अरुण फिरोदिया यांच्या हस्ते करण्यात आले. नगर नियोजन, हवामान बदलाचा परिणाम, सार्वजनिक आरोग्य, इको-मोबिलिटी या संकल्पनांवर या परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली.
या परिषदेसाठी इन्स्टिट्यूट ऑफ टाऊन प्लॅनर्स इंडिया, एरिअन्स, लायन्स क्लब ऑफ पुना इंटरनॅशनल, ‘अल्युमनी असोसिएशन ऑफ कॉलेज ऑफ इंजिनिअरींग’, ‘संजय पगारे अॅन्ड कंपनी’( नाशिक), ‘कोमत्सू एनटीसी लि.’, ‘पुणे महनगर परिवहन महामंडळ’, ‘पब्लिक वर्क डिपार्टमेंट’( महाराष्ट्र), ‘आदित्य किचन सिस्टीम’, ‘ग्रीव्हज पॉवर’, ‘मार्केश रेस्टॉरन्ट’, ‘डॉमिनोज पिझ्झा’, ‘कॅफे चॉकोलेड’, ‘स्मोक एन जोन्स’, ‘एरिझोना रेस्टॉरन्ट’ यांनी सहकार्य केले होते.