सभागृह नेते सुभाष जगताप यांच्या हस्ते अधिकृत परवान्यांचे स्टॅालधारकांना वाटप
पुणे : गजानन महाराज चौक व गोळवलकर रस्त्यावरील परवानाधारक स्टॅालचालकांचे पुर्नवसन करण्यासाठी सहकारनगर परिसरात नव्या अत्याधुनिक मंडईची उभारणी करण्यात येईल असे मत सभागृह नेते सुभाष जगताप यांनी व्यक्त केले. वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी पुढील काळात महापालिकेस परवानाधारक स्टॅालचालकांचे पुर्नवसन करावेच लागणार आहे. तेव्हा, परवानाधारकांनी आपले परवाने विकू नयेत. देशातील आठव्या क्रमाकांचे शहर म्हणुन पुण्याची ओळख असून या शहरात रोजगार करण्याची सुवर्णसंधी परवानाधारक स्टॅालचालकांना मिळाली आहे. येथून पुढे रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होईल अशा पध्दतीने अतिक्रमण करु नये याची दक्षता सर्वांनी घ्यावी.
ढुमे क्रिडासंकुल, सहकारनगर क्रमांक दोन येथे स्टॅालधारकांना अधिकृत स्टॅालचा परवाना वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाचे सहायक आयुक्त विजय लांडगे, अतिक्रमण निरिक्षक श्रीकृष्ण सोनार, अतिक्रमण निरिक्षक शशिकांत टाक, दिलीप कांबळे(अरुंदेकर), महापालिका फेरीवाला समितीचे सदस्य दिनेश खराडे, अनंत कामत व मनोज बिडकर हे उपस्थित होते. या प्रसंगी ३५ परवान्यांचे वाटप सभागृह नेते सुभाष जगताप यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
रमेश शेलार, सुवर्णा चांदणे, शाखिबी शेख, गंगेश लोंढे, शेखर सोंडे व सरस्वती खंडाळे यांना प्रातिनिधी स्वरुपामध्ये परवान्याचे वाटप करण्यात आले.