पुणे-
रास्ता पेठमध्ये युनिटी कॉम्प्लेक्समध्ये परफेक्ट शैक्षणिक संकुलाचे उदघाटन राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले . पुणे शहरात गेली १४ वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणारी परफेक्ट उत्कृष्टपणे कार्य करीत आहे . यावेळी परफेक्ट शैक्षणिक संकुलाचे संस्थापक इरफान सय्यद , हीना सय्यद , नगरसेवक अविनाश बागवे , मयुर झेंडे , रईस सुंडके ,आदनान शेख , फरहान सय्यद , बांधकाम व्यावसायिक आरिफ सय्यद , परफेक्ट शैक्षणिक संकुलाचे कोंढवा शाखा प्रमुख मोबीन सय्यद , मुश्ताक खान , जाफर सय्यद , तारिक शेख , शफिक सय्यद , रफिक सय्यद , मंगेश परतानी, जलाउद्दिन खान आदी मान्यवर व शिक्षक ,पालक विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत हीना सय्यद यांनी केले तर सूत्रसंचालन मारिया देठे यांनी केले तर आभार परफेक्ट शैक्षणिक संकुलाचे प्रमुख इरफान सय्यद यांनी केले . या कार्यक्रमाचे संयोजन शहानवाज शेख , अशरफ दिल्लीवाला , नवाज इनामदार , समीर सय्यद आदींनी विशेष परिश्रम घेतले . परफेक्ट शैक्षणिक संकुल दीड हजार चौरस क्षेत्राफळात पाच वर्गखोल्या असून , मॉर्डन अम्युनिटीज , वातानुकुलीत वातावरनात विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मिळणार आहेत . तसेच सुरक्षेसाठी सी सी टी व्ही यंत्रणा , ई – लर्निंगद्वारे आधुनिक शिक्षण देण्यात येणार आहे .