मुंबई – इंग्रजी गाणी नकोत हिंदी गाणी लाव असे सांगताना पब मध्ये ख्यातनाम अभिनेत्यावर मोठा बाका प्रसंग मुंबईत उदभवला, एका अभिनेत्याला जर अशा प्रसंगांना पब मध्ये सामोरे जावे लागत असेल तर अन्य ग्राहकांचे काय होत असेल ? हा प्रश्न आता निर्माण होणार आहे . बॉलीवूडच्या चित्रपटांत ,केवळ नशिबानेच मागे राहिलेल्या आदित्य पांचोलीला एका फाइव्ह स्टार पबमध्ये मारहाण केल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.यावेळी आदित्यला अपमानाला सामोरे जावे लागल्याने पब चे बाऊंसर्स आणि त्याच्यात बाचाबाची झाली हॉटेल सी प्रिन्सेसच्या ट्रायोलॉजी पबमध्ये ही घटना घडली.
आदित्य पांचोलीने शनिवारी रात्री ही मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबईतील युही येथे असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलच्या पबमध्ये आदित्य पांचोलीने बाऊंसर्सना मारहाण केली. पबमध्ये हिंदी गाणी वाजवली जात नसल्याने आदित्य पांचोली नाराज होता, असे सांगितले जात आहे. त्यानंतर आदित्यने मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
याआधीही आदित्य पांचोलीला काही वेळा मारहाण प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आदित्य पांचोलीला आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून त्याची कोठडीत रवानगी करायची की, जामीन द्यायचा यावर निर्णय होणार आहे.