(पुणे :अनिल चौधरी )
महाराष्ट्रातील पत्रकारांवर वारंवार होणाऱ्या हल्ले विरोधात वारंवार जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्री यानां निवेदने दिली आहेत , पत्रकार हल्ला विरोधी कायदा लवकरच मंजूर होईल तसेच महाराष्ट्रातील पत्रकारांच्या त्यांच्या अधिकारासाठी खंभीरपणे पाठीशी उभा राहील असे मत महाराष्ट्र पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष विनोद पत्रे यांनी सोलापूर येथे शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांच्या बैठकीत व्यक्त केले .
सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार संरक्षण समितीच्या बैठकीत अधिस्वीकृती कसे मिळवाल , वर्तमान पत्र पंजीकरण करण्यात आलेल्या अडचणी , तसेच पत्रकार संपादक , मालक , पत्रकारांच्या विविध मागण्याबाबत मार्गदशन त्यांनी यावेळी केली. पत्रकारांना आरोग्य विमा लागू करणे , एखाद्या पत्रकाराचा अपघातात मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियाना मदत मिळवून देणे , पत्रकारांना टोल माफी करणे , पत्रकारांच्या न्याय मागण्यांसाठी लढा पुकारण्याचे यावेळी ठरविण्यात आले.
याप्रसंगी सोलापूर पत्रकार समितीवर प्रमुख म्हणून यशवंत पवार यांची नेमणूक करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुका पदाधिकारी यांची देखील यावेळी नेमणूक करण्यात आली. यामध्ये मंगळवेढा तालुका प्रमुख पदी ढावरे यांची नेमणूक केली आहे. मोहोळ तालुका समितीवर राजीव साखरे तसेच अक्कलकोट समितीवर सुभाष रणदिवे तर पंढरपूर तालुका समितीवर आबासाहेब गायकवाड यांच्या नेमणुका समितीचे अध्यक्ष विनोद पत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंत पवार , प्रदेश अध्यक्ष नंदकिशोर धोत्रे , प्रदेश सचिव विजय सूर्यवंशी , राष्ट्रीय अध्यक्ष अशोक मात्रे , डॉन कुंजूकुंजू , पुणे जिल्हा समिती प्रमुख अनिल चौधरी , लक्ष्मण मढवी , तांडेल साहेब , मदन पाटील यांनी याबाबतचे नियुक्ती पत्रे त्यांना देण्यात आली. याप्रसंगी आगामी रोल नं 18 या चित्रपटाच्या टीमने सर्व पत्रकार तसेच पत्रकार संरक्षण समितीच्या पदाधिकारी यांची भेट घेऊन सत्कार देखील करण्यात आला .
याप्रंगी सोलापूर जिल्ह्यातील पत्रकार , संपादक मोठ्या प्रामाणात उपस्थित होते .
पत्रकारांच्या खंबीरपणे पाठीशी : विनोद पत्रे
Date:

