पुणे-पत्नी सौ.जयश्री बागुल यांची आणि मुलांची साथ मिळाल्याने आबा बागुल सारखा कार्यकर्ता भक्कम पणे कार्यरत राहिला आणि उल्लेखनीय कार्य करू शकला हे उद्गार भाजपचे राज्यातील समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप
कांबळे यांनी काढले आहे निमित्त होते … पुणे नवरात्रो महोत्सवातील लावणी महोत्सवाचे …
लय, अदा, नृत्य यांचा त्रिवेणी संगम असलेल्या पारंपारिक तसेच ठसकेबाज लावण्या…रसिकांनी टाळया
आणि शिट्या वाजवून दिलेली भरभरून दाद अशा जल्लोषपूर्ण वातावरणात लावणी महोत्सव श्री गणेश कलाक्रीडा
रंगमंच येथे संपन्न झाला.
पुणे नवरात्रौ महोत्सवांतर्गत या ‘महालावणी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. पुरुषांप्रमाणेच महिलांची
उपस्थिती आणि त्यांनी टाळ्या, शिट्या व वन्समोअरने कलावंतांना दिलेली दाद याने रंगमंच दणाणून सोडले.
या रावजी…बसा भावजी, कारभारी दमानं…, आबा जरा सरकून बसा…, शिटी वाजली.., लाडाची ग लाडाची, मी कैरी
पाडाची…, सोडा राया सोडा हा नाद्खुळा…., थेंबा थेंबानं…, तुमच्या पुढ्यात कुटते मी, ज्वानीचा मसाला…. यावं यावं
दिलाच्या दिलवरा… यांसारख्या जुन्या आणि नव्या लावण्याचे बतावणीसह सादरीकरण, शांताबाई या गाजलेल्या
लोकगीताचे लेखक संजय लोंढे यांनी स्वत: हे गीत गाऊन त्यावर नाच करणाऱ्या लावणी सम्राज्ञी तसेच
कलावंतांची थिरकलेली पाऊले आणि त्यांच्या लय, अदाकारीने प्रेक्षकांना घायाळ केले. टाळ्या, शिट्या आणि
वन्समोअरने प्रेक्षकांनी रंगमंच डोक्यावर घेतले.विविध लावणी ग्रुपच्या एकाच ठिकाणी सादर झालेल्या या
दिलखेचक अदाकारीच्या आविष्काराने रसिकांना घायाळ केले.
या लावणी महोत्सवात लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या नटरंगी नार,राधिका पाटील व साधना पुणेकर यांचा
यांच्या मदमस्त अप्सरा, पूनम कुडाळकर व पूजा पाटील यांच्या तुमच्यासाठी कायपण,सिनेअभिनेत्री शिवानी यांचा
लावणी महासंग्राम, टीना शर्मा व प्रिया मुंबईकर यांचा लावणी ऑन फायर तर सीमा पोटे व वसुंधरा पुणेकर
यांच्या ज्वानीचं पाखरू, या ग्रुपने सहभाग घेतला. हा लावणी महोत्सव दुपारी १२ पासून सलग १२ तास चालू
राहिला. प्रारंभी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे संयोजक अध्यक्ष उपमहापौर आबा बागुल यांनी मंचावर नारळ वाढवून
पूजा केली. त्यावेळी नगरसेविका लक्ष्मीताई घोडके, लताताई राजगुरू, नगरसेवक राहुल तुपेरे तसेच मनपा
अधिकारी सतीश मानकामे आदी उपस्थित होते.
सायंकाळी लावणी महोत्सवाला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राज्याचे समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप
कांबळे, विधानपरिषदेचे गटनेते आमदार शरद रणपिसे, माजी मंत्री चंद्रकांत छाजेड, मोहन जोशी, महिला
कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष विद्याताई पाटील, पुणे नवरात्रौ महोत्सवाचे संयोजक अध्यक्ष उपमहापौर आबा बागुल
नगरसेवक राजेंद्र शिळीमकर आदीच्या उपस्थितीत हा लावणी महोत्सव रंगला. या सर्व मान्यवरांनी लावणी
महोत्सवाचा आनंद घेतला.
यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, पुणे नवरात्रौ महोत्सवाचे नाव देशात झाले आहे. या महोत्सवाला
लोकप्रियता व लोकमान्यता मिळाली आहे. केवळ सांस्कृतिक क्षेत्रात काम न करता आबा बागुल यांचे सामाजिक
ऐक्याचे काम, शिक्षण क्षेत्रातील विशेषत: मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी सुरु केलेल्या ई-लर्निंग शाळेचे
कौतुक करावे तितके थोडे आहे. या शाळेतील २७ विद्यार्थी आयआयटी मध्ये गेले यापेक्षा त्यांच्या कामाची आणखी
कोणती पावती पाहिजे. त्यांच्या प्रभागात त्यांनी राबविलेले उपक्रम हे सुद्धा अद्वितीय आहेत. त्यांचे काम
बघता त्यांना आमदार करण्याची जबाबदारी आम्हा सर्वांना घ्यावी लागेल असे आश्वासन विखे पाटील यांनी यावेळी
दिलीप कांबळे म्हणाले, आबा बागुल यांचा वॉर्ड बदलला मात्र ते सातत्याने काम करीत राहिले. पर्वती
मतदारसंघात त्यांनी त्यांच्या कामातून वेगळा ठसा उमटविला आहे. आबा व माझी मैत्री राजकारणापलीकडची
मैत्री आहे असेही त्यांनी नमूद केले. पार्वती मतदार संघात आबा बागुल यांनी सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक
क्षेत्रात केलेल कार्य हे उल्लेखनीय आहे असे गौरोद्गार त्यांनी काढले. त्यांच्या पत्नी सौ.जयश्री बागुल यांची त्यांना
साथ मिळाल्याने ते हे कार्य करू शकले असेही ते म्हणाले.
विधान परिषदेचे कॉंग्रेस पक्षाचे गटनेते म्हणून आमदार शरद रणपिसे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार
यावेळी करण्यात आला.
शरद रणपिसे म्हणाले, पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या माध्यमातून आबा बागुल यांनी जनतेच्या मनात एक वेगळे
स्थान निर्माण केले आहे. दिलीप कांबळे यांच्या भाषणात त्यांनी आबा व मी दोघेही गजरे विकत होतो असा
उल्लेख केला त्याचा संदर्भ देत रणपिसे म्हाणाले, गजरेवाले मंत्री होतात. आबांना जनतेचा आशीर्वाद आहे त्यामुळे
तेही निश्चित मंत्री होतील.
पुणे नवरात्रौ महोत्सवाचे संयोजक अध्यक्ष उपमहापौर आबा बागुल यांनी सर्वांचे स्वागत केले. लावणी सारखी
लोककला ही महाराष्ट्राचे भूषण असून ही लोककला विविध माध्यमातून जगभर पोहचत आहे, ही प्रत्येक मराठी
माणसासाठी अभिमानाची बाब आहे असे सांगत त्यांनी ते राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.देशात अच्छे
दिन येणार की नाही माहिती नाही परंतु १९८५ साली विना दप्तराच्या शाळेची कल्पना स्व. राजीव गांधी यांनी
आणलेल्या संगणक युगामुळे मांडली गेली. देशात पहिली ई-लर्निंग शाळा सुरु करून आपण ते सिद्ध करून
दाखविले असे त्यांनी सांगितले.
यावेळी शांताबाई या गाजलेल्या लोकगीताचा गायक संजय लोंढे यांचा सत्कार राधाकृष्ण विखे पाटील यांनी
केला. शांताबाई हे गाणे व्हाटस् अपवर फिओरात असताना हे नेमके काय आहे हे माहिती नव्हते. मात्र, संजय लोंढे
यांचे कौतुक करायला पाहिजे. सामान्य माणसाने असामान्य कर्तुत्वाला आपण दाद दिली पाहिजे असे विखे पाटील
यावेळी सर्व लावणी कलाकारांचा सत्कार राध्कृष्ण विख विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
हा महोत्सव यशस्वी होण्यासाठी नंदकुमार बानगुडे, अमित बागुल, राजेंद्र बागुल, घन:शाम सावंत, नंदकुमार
कोंढाळकर, रमेश भंडारी आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.