गुरुदासपूर चकमक अखेर सायंकाळी संपली यात ३ दहशतवादी ठार मारण्यात आले मात्र गुरुदासपूर हल्ल्यात पंजाब पोलिसांच्या गुप्त वार्ता विभागाचे पोलीस अधीक्षक बलजीत सिंह यांना वीरमरण आले आहे. एसपीसह आठ पोलिस, आणि अन्य काही नागरिक हल्ल्यात मरण पावले
आज पहाटे सुमारे ३ दहशतवाद्यांनी येथील दिनानगर पोलीस स्टेशनवर हल्ला केला त्यानंतर तब्बल ११ तास पोलीस आणि दहशतवादी यांच्यात चकमक उडाली. ती आता संपली आहे.
भारत-पाकिस्तान सीमेच्या जवळ हे पोलीस स्टेशन आहे. काही महिन्यापूर्वी याच पोलीस स्टेशनवर हल्ला झाला होता. हल्लेखोर लष्करी वेशात आले. त्यांनी आधी येथील बसस्थानकावर हल्ला केला. त्यामध्ये पाच ते सहा जण जखमी झाले.
पाकिस्तान बॉर्डरपासून अवघ्या 15 किमी अंतरावर असलेल्या पंजाबच्या गुरदासपूरमध्ये आज (सोमवारी) सकाळी दहशतवादी हल्ला झाला. पंजाबमध्ये 20 वर्षांनंतर अशा प्रकारचा दहशवादी हल्ला झालेला आहे.
लष्कराच्या गणवेशात आलेल्या चार दहशतवाद्यांनी आधी जम्मूच्या कटरा येथे जाणाऱ्या बसवर हल्ला केला. त्यानंतर गोळीबार करतच त्यांनी दीनानगर पोलिस ठाण्यात प्रवेश केला. तसेच एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यातही यश आले असून, दहा जण जखमी आहेत. गुप्तचर यंत्रणांच्या मते हे दहशतवादी पाकिस्तानच्या नारोवलमधून आलेले असल्याची शक्यता आहे. सकाळी पाच वाजता हा हल्ला सुरू झाला. अजूनही थोड्या थोड्या वेळाने फायरिंग सुरूच आहे. हल्लेखोरांमध्ये एका महिलेचाही समावेश असल्याचे समजते. दहशवाद्यांनी रेल्वे स्थानकावरही बॉम्ब ठेवले होते. पण, ते निकामी करण्यास यश आले.
घुसखोरी रोखण्यासाठी सीमेवर नाकेबंदी का केली नाही – बादल केंद्रावर बरसले
दरम्यान चकमक सुरु असताना ….
दहशतवाद ही राष्ट्रीय समस्या असल्याचे पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल सोमवारी म्हणाले. त्याचवेळी जर गुप्तचर संस्थांना अशा प्रकारच्या हल्ल्याची माहिती मिळाली होती, तर घुसखोरी रोखण्यासाठी सीमेवर नाकेबंदी करायला हवी होती, अशा शब्दांत बादल यांनी नाराजीही व्यक्त केली.
हल्ला केलेले दहशतवादी हे पंजाबमधून आलेले नाही. ते सीमेवरून घुसखोरी करून आले आहेत त्यामुळे अशा प्रकारची घुसखोरी रोखण्यासाठी सीमेवर नाकेबंदी करण्याची जबाबदारी ही, गृहखात्याची असते. मग माहिती असूनही अशी नाकेबंदी का केली नाही ? असा सवाल बादल यांनी केला. पंजाबमध्ये अनेक वर्षांनंतर अशा प्रकारचा हल्ला झालेला आहे. पण दहशतवाद ही राष्ट्रीय समस्या आहे. ती राज्याची समस्या नाही. त्यामुळे राष्ट्रीय धोरणाप्रमाणेच यावर तोडगा काढावा लागणार असल्याचेही बादल म्हणाले.
पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल हे तापाने फणफणले असल्याने आजारी आहेत. पण तरीही ते सुरक्षा संस्थांच्या संपर्कात असून या हल्ल्याबाबत माहिती घेत आहेत. आमचे अधिकारी अत्यंत शौर्याने हल्ल्याला उत्तर देत आहेत. माझी तब्येत ठीक नसली तर दर 10-15 मिनिटांनी संपर्कात राहत असल्याचे बादल म्हणाले आहेत. ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर यासंदर्भात सविस्तर चर्चा करून आगामी काळात असे हल्ले टाळण्यासाठी, प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले.
मोदी पाकिस्तानसोबत चर्चा करत आहेत, ते दहशतवादी पाठवत आहे
समाजवादी पक्षाचे नेते नरेश अग्रवाल म्हणाले, पंतप्रधान मोदी पाकिस्तानसोबत चर्चा करण्यास उत्सूक आहेत आणि दुसरीकडे त्यांच्याकडून दहशतवादी पाठवले जात आहेत. पंजाबात झालेला हल्ला हे भारतीय गुप्तचर संस्थेचे अपयश आहे. हल्ल्याचा संसदेत सर्वपक्षीयांनी निषेध केला. त्यानंतर झालेल्या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर काही वेळातच बंद पडले.
समाजवादी पक्षाचे नेते नरेश अग्रवाल म्हणाले, पंतप्रधान मोदी पाकिस्तानसोबत चर्चा करण्यास उत्सूक आहेत आणि दुसरीकडे त्यांच्याकडून दहशतवादी पाठवले जात आहेत. पंजाबात झालेला हल्ला हे भारतीय गुप्तचर संस्थेचे अपयश आहे. हल्ल्याचा संसदेत सर्वपक्षीयांनी निषेध केला. त्यानंतर झालेल्या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर काही वेळातच बंद पडले.
काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार आनंद शर्मा म्हणाले, काश्मीर खोऱ्यात पाकिस्तानचा झेंडा फडकवणे, ही घटना कशीही सहन केली जाऊ शकत नाही. सरकारने त्या लोकांविरोधात कोणती कारवाई होईल याचे आश्वासन देखील दिलेले नाही.



