पंकजा मुंडे समर्थनार्थ पुण्यात रासप ची निदर्शने
धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला मारले जोडे
पुणे :
महिला ,बाल कल्याण विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या यांच्यावरील खोट्या आरोपांच्या निषेधार्थ पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पक्षाचे प्रदेश प्रवक्ते दीपक बिडकर ,अनुसूचित आघाडी अध्यक्ष बाळासाहेब हंगारगे ,महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष श्रद्धा भातंब्रेकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली
धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला यावेळी कार्यकर्त्यांनी जोडे मारून निषेध व्यक्त केला . निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या . सोमवारी सकाळी ही निदर्शने झाली . यावेळी डॉ उज्वला हाके ,पुणे शहराध्यक्ष देवेंद्र धायगुडे ,बाळासाहेब कोळेकर ,अंकुश देवडकर ,सागर गोरे ,रमेश पाटील ,सुरज खोमणे ,बाळासाहेब शिंदे ,महादेव हरपळे ,
दरम्यान ,मुंबई चेंबूर येथे पक्षाध्यक्ष महादेव जानकर यांनी निदर्शनात भाग घेतला . जिल्हा आणि सर्व तालुक्यांच्या ठिकाणी राज्यभर रासप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून पंकजा मुंडे यांना पाठींबा दिला . मुंबईत विलेपार्ले ,बोरीवली येथेही निदर्शने करण्यात आली
‘ राष्ट्रीय समाज पक्ष हा पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा आहे . त्यांच्यावरील खोटे आरोप आम्ही सहन करणार नाही . प्रतीमाहनन करण्यसाठी केलेलं हे षड्यंत्र यशस्वी होवू देणार नाही ‘ असे प्रदेश प्रवक्ते दीपक बिडकर यांनी पुणे विभागीय कार्यालयासमोर कार्यकर्त्यांशी संबोधित करताना सांगितले . डॉ उज्वला हाके ,श्रद्धा भातंब्रेकर ,बाळासाहेब कोळेकर ,देवेंद्र धायगुडे यांचीही भाषणे झाली
कार्यकर्त्यांनी त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात निवेदन सादर केले