यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी सुरेंद्र भट्टराई म्हणाले, की भूकंपानंतर जवळपास दररोजच भुस्खलनाच्या घटना घडत आहेत. काल (बुधवार) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली तेव्हा लोक घरी झोपले होते.
नेपाळ मध्ये जमीन खचली ६ गावे गाडली गेल्याची भीती … ?
काठमांडू- नेपाळच्या पूर्वेकडील पर्वतांमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने भुस्खलन झाले असून त्याखाली६गाव दबले असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी घरांमध्ये झोपलेल्या ३० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी सुरेंद्र भट्टराई म्हणाले, की भूकंपानंतर जवळपास दररोजच भुस्खलनाच्या घटना घडत आहेत. काल (बुधवार) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली तेव्हा लोक घरी झोपले होते.
यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी सुरेंद्र भट्टराई म्हणाले, की भूकंपानंतर जवळपास दररोजच भुस्खलनाच्या घटना घडत आहेत. काल (बुधवार) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली तेव्हा लोक घरी झोपले होते.
भुस्खलनाने तपलजंग जिल्ह्यातील गावांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना रात्रीच्या वेळी झाल्याने मोठे नुकसान झाले असल्याचे सांगितले जात आहे.
भट्टराई यांनी सांगितले, की जोरदार पावसामुळे पूर्वेकडील भागांत भुस्खलनाचा धोका वाढला आहे. नेपाळमध्ये या दिवसांमध्ये भुस्खलन होण्याच्या घटना सामन्य आहेत. बुधवारी झालेल्या भुस्खलनानंतर 12 लोक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. पण याची अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. ही परिसर फारच दुर्गम आहे. पर्वतांमध्ये असलेल्या या गावापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक तास लागतात.
डीएसपी शांती राज कोईराला यांनी सांगितले, की अनेक घरे ढिगाऱ्यांसाठी दबले आहेत. त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या लोकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. बचाव आणि मदत कार्यासाठी पोलिसांचे एक पथक पाठविण्यात आले आहे.