पुणे :
नेत्रतज्ज्ञ डॉ. रमेश मूर्ती यांना नुकतेच ‘डॉ.मधूसुदन झंवर नेत्रसेवा अॅवॉर्ड 2015-16’ आणि ‘शुभदा एन. कुलकर्णी अॅवॉर्ड’ ने गौरविण्यात आले. ‘पुणे नेत्रतज्ज्ञ संघटना’ आणि ‘इंटरनॅशनल सोसायटी ऑफ मॅन्युअल स्मॉल इन्सिशन कॅटरॅक्ट सर्जन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मोतिबिंदू विषयी व्यापक परिषदे’दरम्यान हा पारितोषिक प्रदान कार्यक्रम झाला.
‘पुणे नेत्रतज्ज्ञ संघटना’ आणि ‘इंटरनॅशनल सोसायटी ऑफ मॅन्युअल स्मॉल इन्सिशन कॅटरॅक्ट सर्जन’च्या 8 व्या वार्षिक परिषदेमध्ये डॉ. रमेश मुर्ती यांना ही पारितोषिके प्रदान करण्यात आली. हॉटेल जे.डब्ल्यू.मेरिट, पुणे येथे ही परिषद झाली. या परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ संगीतकार व गायक पंडीत हृदयनाथ मंगेशकर, यांच्या हस्ते झाले.
नेत्रतज्ज्ञ डॉ. रमेश मूर्ती यांना ‘डॉ. मधूसुदन झंवर नेत्रसेवा अॅवॉर्ड 2015-16’ हे पारितोषिक संस्थात्मक, वैज्ञानिक आणि सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल तरूण नेत्रचिकित्सक म्हणून देण्यात आले. तर शुभदा एन.कुलकर्णी हे पारितोषिक ‘ऑफ्थालमिक प्रश्नमंजुषा 2014-15’ मधील विजेता म्हणून देण्यात आले.
परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्द उद्योजक बाबा कल्याणी उपस्थित होते. यावेळी पुणे नेत्रतज्ञ संघटने’चे अध्यक्ष डॉ. माधव भट, डॉ. राधिका परांजपे, महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. सलील गडकरी, अखिल भारतीय नेत्रतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. देबाशीष भट्टाचार्य उपस्थित होते.

