पुणे धर्म प्रांताच्यावतीने पर्यावरणाच्या रक्षणासाठी , निसर्ग संवर्धनासाठी पुणे शहरात ” भव्य पर्यावरण जनजागृती पदयात्रा ” उत्साहात संपन्न झाली .
या भव्य पर्यावरण पदयात्रेची सुरुवात सकाळी ९ वाजता , क्वार्टर गेट चौकातील ऑर्नेला हायस्कूलपासून सुरुवात झाली . लक्ष्मी रोड , सिटी चर्च , साचापीर स्ट्रीट , इस्ट स्ट्रीट , इंदिरा गांधी चौक , व्होल्गा चौक , मोहम्मद रफी चौक , महात्मा गांधी रोड , कोहिनूर चौक , भोपळे चौक , बाबाजान चौक , कॉन्व्हेन्ट स्ट्रीट या मार्गे काढण्यात येउन सेंट व्हीन्सेट शाळेच्या मैदानावर या पदयात्रेचा समारोप करण्यात आला . या पदयात्रेचे उद्घाटन जेष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांच्या हस्ते वृक्षास पाणी घालून करण्यात आले . यावेळी पुणे धर्म प्रांताचे बिशप राईट रेव्हरंड थॉमस डाबरे, शिलॉंग येथील आर्क बिशप डॉमनिक झाला , पुण्याचे चर्च ऑफ नॉर्थ इंडियाचे बिशप राईट रेव्हरंड अंडरयु राठोड ,फादर माल्कम सिक्वेरा , मुस्लिम समाजाचे अभ्यासक अनिस चिस्ती , मुस्लिम वेल्फेअर एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष वाहिद बियाबानी , नितीन डिसोझा , जेम्स पॉल, केविन मेनवेल , ख्रिस्ती साहित्यिक अशोक आंग्रे , फादर गोडविन सलढाना , फादर जेम्स लुईस , फादर आयरिस फर्नाडिस , डॉ. कॉलीन लुझाडो ,फादर अंडरयु फर्नाडीस,फादर डायगो आल्मेडा आदी मान्यवर आणि २८ शाळा सुमारे आणि२ महाविद्यालयामधील दोन हजार विद्यार्थी तसेच सर्वधर्मीय लोक सहभागी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . या पदयात्रेत निसर्गाचा ऱ्हास थांबवा , हवा पाणी दुषित करू नका , जिथे आहे स्वछता , तिथे वसे देवता असे निसर्गाचे जनजागृतीपर संदेशाचे फलक घेऊन विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले होते .
समारोपाच्या वेळेस सेंट व्हिन्सेट शाळेच्या मैदानावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे पर्यावरण जनजागृतीपर नृत्ये विद्यार्थ्यांनी सादर केली . यावेळी पुणे धर्म प्रांताचे बिशप राईट रेव्हरंड थॉमस डाबरे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाचा संदेश पृथ्वीला वाचविण्याचा संदेश दिला , सर्व विद्यार्थी मनापासून पदयात्रेत सहभागी होऊन पदयात्रा यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल आभार मानले .
यावेळी सर्व उपस्थितांचे स्वागत फादर गोडविन सलढाना यांनी केले तर सूत्रसंचालन सिनी डेव्हिड यांनी केले तर आभार फादर माल्कम सिक्वेरा यांनी मानले . या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली .



