शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील काँग्रस व रिप. पक्षाचेउमेदवार विनायक निम्हण यांनी शिवाजीनगर
गावठाण परिसरात प्रचार फेरी काढली.
निम्हण यांनी आज सकाळी चतु:शृंगी देवी, रोकडोबा आणि श्रीरामाचेदर्शन घेऊन प्रचारफेरीला सुरुवात
केली. ढोल-ताशांच्या गजर आणि विनायक निम्हण यांनाच विजयी करा, अशा निनादात संपूर्ण वातावरण
निम्हणमय झालेहोते. जागोजाग तेनागरीकांशी संवाद साधून मत देण्याचेआवाहन करीत होते. नागरीकही
त्यांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत असल्याचेचित्र होते. ‘सिंघम’च्या धर्तीवर ‘निम्हण’ ची
गाणी लक्षवेधक ठरली. या प्रचारफेरीत तरुणांबरोबरच ज्येष्ठ नागरीक, महिलाही मोठ्या संख्येनेसहभागी
झाल्या होत्या. शिवाजीनगर गावठाणातील रोकडोबा देवस्थानपासून सुरुझालेली ही प्रचारफेरी नाथ गल्ली, मोरे
पथ, भागुबाई पांडुरंग खेडेकर पथ, कै. पांडुरंग खेडेकर चौकातून तात्याबा साधुजी पथ मार्गेमार्गस्थ झाली. पुढेती
कै. बाबुराव पिसेपथमार्गेकै. महादेव तुकाराम खेडेकर चौकात आली. या चौकात महिलांनी निम्हण यांचेऔंक्षण
केले. त्यानंतर प्रचारफेरी शिवाजी व्यायाम मंडळमार्गेवरची आळी तालीम, रामगढिया बोर्ड, सिताई मार्ग,
मुंजोबा तरुण मंडळासमोरून विठ्ठल मंदिराजवळ आली. इथेनिम्हण यांनी श्री विठ्ठलाचेदर्शन घेतले. पुढेही
फेरी युसुफ खुदाबक्ष शेख मार्गानेमहापालिका भवनजवळ निघाली. तिथून सिद्धार्थ चौक, जैन मंदिर
परिसरातील नागरीकांना मत देण्याचेआवाहन करीत छत्रपती शिवाजी पुतळा चौकामार्गेजुना तोफखाना, साई
बाबा मंदिरामार्गेराजीव गांधीनगरमध्येआली. या ठिकाणीही त्यांचेजंगी स्वागत करण्यात आले. संपूर्ण राजीव
गांधी वसाहत पिंजून काढत प्रचारफेरी कामगार पुतळा वसाहतीजवळ थांबली. यावेळी नागरीकांनी निम्हण यांनी
केलेल्या कामाचेकौतुक केले. निवडणूकीत काँग्रेसच विजयी होईल आणि निम्हण इतिहास घडवतील, असा
विश्वास व्यक्त केला.
माझी निष्ठा मतदारांप्रती असल्यामुळेमी मतदारसंघात विकासाची गंगा आणली. यापुढेआता
आपल्याला ज्येष्ठ नागरिक, तरुण, विद्यार्थी, बेरोजगार युवक, निराधार, विधवा परितक्त्या महिलांसाठी भरीव
कार्य करायचेआहे. हेकार्य तडीस न्यायचेअसून त्यासाठी आपलेपाठबळ आवश्यक आहे, अशी अपेक्षा
निम्हण यांनी व्यक्त केली.
निम्हण यांची गावठाण परिसरात प्रचार फेरी
Date:

