पुणे : निगडी येथील सेंट उर्सुला शाळेत आज सकाळी विद्यार्थ्यांनी उर्जा बचतीची प्रतिज्ञा केली. महावितरणच्या वतीने राष्ट्रीय उर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त या शाळेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाला अधीक्षक अभियंता श्री. महेंद्ग दिवाकर, कार्यकारी अभियंता श्री. धर्मराज पेठकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. रमेश जाधव, उपकार्यकारी अभियंता श्री. नवीन वैद्य, सहाय्यक अभियंता श्री. कल्याण जाधव, श्री. संतोष पाटणी आदींची उपस्थिती होती. सेंट उर्सुला शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रार्थनेनंतर उर्जा बचतीची प्रतिज्ञा केली. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. महेंद्ग दिवाकर, अभियंता श्री. संतोष पाटणी यांनी वीजबचतीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.