पुणे-
राजकारणात कोणी कुणाचा मित्र नसतो असे म्हणतात तेच खरे असल्याची प्रचीती आज पुण्यात आली – नारायण राणे यांचा वांद्र्यात दारूण पराभव झाल्यानंतर दीर्घ काळ पुण्यातील नारायण राणेंचे कट्टर समर्थक असलेले सध्या शिवसेनेत दाखल झालेले माजी आमदार आणि शिवसेनेचे शहराध्यक्ष विनायक निम्हण यांनी जोरदार जल्लोष करीत सेनेच्या विजयाची आणि राणेंच्या पराभवाची उंच पताका फडकावली आहे वांद्रे येथील विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या श्रीमती तृप्ती सावंत यांच्या विजयानिमित्त पुणे शहर शिवसेनेच्या वतीने टिळक पुतळा (मंडई) येथे शिवसेना शहरप्रमुख विनायक निम्हण यांच्या हस्ते साखर व पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.- वांद्रे (पूर्व) पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांनी काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांचा 19 हजार 8 मतांनी पराभव करीत त्यांना धूळ चारली . . शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांना 52 हजार 711 मते मिळाली आहेत. तर, नारायण राणेंना 33 हजार 703 मते मिळाली. एमआयएमचे उमेदवार राजा रहेबर खान यांना केवळ 15 हजार 50 मते मिळाली व ते तिस-या क्रमांकावर फेकले गेले.

आज सकाळी 8 वाजता वांद्रे पूर्वच्या समाज मंदिर सभागृहात मतमोजणी सुरू झाली. मात्र तृप्ती सावंत यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेत राणेंना पिछाडीवर ढकलले होते. राणेंची ही पिछाडी कायम राहिली व उत्तरोत्तर फेरीत ती वाढतच गेली. अखेर तृप्ती सावंत यांनी राणेंचा 19 हजारांहून अधिक मतांनी दारूण पराभव केला.