मुंबई
दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या परीक्षेसाठी आक्टबारची वाट पहावी लागते. यात विद्यार्थ्यांचं संपूर्ण एक वर्ष वाया जातं. यामुळे विद्यार्थ्यांच्या करिअरचं नुकसान होतं. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये यासाठी सरकार निकालानंतर त्यांना लगेचच संधी देण्याचं विचार करतंय. पुढच्या वर्षापौन नापास झालेल्यांना लगेचच महिनाभरात पुन्हा परीक्षा देत येईल यासाठी काय पावले उचलावी लागतील याचा आमि विचार करतो आहे अनुतीर्ण विद्यार्थ्यांसाठी लगेच परीक्षा घेण्याचा सरकारचा विचार आहे, अशी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली. पण सरकारचा हा निर्णय पुढच्या वर्षापासून लागू होईल. पुढच्या वर्षी मे महिन्यात निकाल लागल्यानंतर मे महिन्याच्या अखेरीस नापास विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा देता येईल, असा सरकारचा विचार आहे. यामुळे फेरपरीक्षेत पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेशही घेता येईल. ऑक्टोबरच्या परिक्षेने वर्ष वाया जातं. म्हणूनच १० वी, १२ वी साठी पुढच्या वर्षी पासून पुनःपरीक्षा लवकर घेऊ, असं तावडे म्हणाले.
यंदा राज्यात दहावीत ८% विद्यार्थी नापास झालेत. या विद्यार्थ्यांना समुपदेशन करता येईल का? हे देखील शाळेने पहावं. तसंच या वर्षी फेरपरीक्षा घेता येऊ शकते का? याबाबत लवकरच चित्र स्पष्ट होईल, असंही तावडेंनी सांगितलं.