पुणे :
आकर्षक विद्युत रोषणाईने झगमगणारे चर्च, येशूच्या जन्मप्रसंगाचे परिसरात साकारलेले देखावे, तसेच सांताक्लॉजची भेट अशा वातावरणात गुरुवारी शहर आणि उपनगरांत नाताळचा सण साजरा करण्यात आला.
ख्रिसमसनिमित्त शहर आणि उपनगरांतील सर्व चर्च व त्याजवळील शाळांना विद्युत रोषणाई करण्यात आली होती. प्रामुख्याने शहरात पुणे स्टेशन, महात्मा गांधी रोड, सोलापूर रस्ता, खडकी, नळस्टॉप या भागासह शहराच्या विविध भागांमधील चर्च विद्युत रोषणाईबरोबरच ख्रिसमस ट्री, चांदण्या, घंटा, बेल्स यासारख्या वस्तूंनी सजले आहे. बुधवारी रात्री बारानंतर येशूजन्माच्या आनंदोत्सवास सुरुवात झाली.
येशूजन्माचा आनंद साजरा करण्यासाठी बुधवारी रात्री कॅम्प, आंबेडकर रस्ता या भागात गर्दीने रस्ते फुलले होते. मेथडिस्ट चर्च, सेंट झेविअर्स चर्च यांच्यासह लष्कर भागातील प्रमुख रस्ते रंगीबेरंगी फुगे, खेळणी, टोप्या विक्रेते यांनी फुलले होते.गुरुवारी सकाळपासून शहरातील अनेक चर्चमध्ये ख्रिस्तजन्माची सुमधूर गाणी ऐकण्यास मिळत होती. गुरुवारी दिवसभर ख्रिश्चन बांधव एकमेकांना भेटून नाताळ सणाच्या शुभेच्छा देत होते. नाताळसाठी त्यांनी घरावर चांदणी, आकर्षक विद्युत रोषणाई आणि नयनरम्य सजावट केली होती.
सांताक्लॉजच्या वेशातील युवतीकडून बुधवारी रात्री कॅबचालकांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. खडकीतील सेंट थॉमस चर्चवर आकर्षक पद्धतीने विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
तसेच भारतर▪मौलाना आझाद सोशल एज्युकेशन अँंड स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे ख्रिसमसनिमित्त सर्मथ पोलिस चौकीचे उपनिरीक्षक विजय झंजाड यांच्या हस्तें गरीबांना चादर वाटप करण्यात आले.विद्युत रोषणाईने उजळले चर्च; बुधवारी रात्री १२ नंतर येशू जन्माच्या उत्सवास प्रारंभपुणे नवरात्रौ महोत्सव समितीच्या वतीने कै.वसंतराव बागूल उद्यानात ख्रिसमस संध्या या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवदर्शन सहकारनगर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी सुमारे दोन हजारपेक्षा अधिक नागरिकांनी गर्दी केली होती. या उपक्रमाचे हे यंदाचे १६ वे वर्ष होते. या कार्यक्रमासाठी वसंतराव बागूल उद्यानात मोठे व्यासपीठ उभारण्यात आले होते. डान्स शोसह लहान मुलांचा आवडत्या सांताक्लॉजने बालगोपाळांचे मनोरंजन केले.
यावेळी माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, नगरसेविका लक्ष्मीताई घोडके, या उपक्रमाचे मुख्य संयोजक उपमहापौर आबा बागूल आदी उपस्थित होते.
या ख्रिसमस संध्या कार्यक्रमाचे सर्वधर्मसमभाव संदेश देणार्या व लहान मुलांचे आकर्षण ठरलेला ख्रिसमस संध्या या आनंद मेळाव्याचा अनेकांनी मनमुराद आनंद लुटला. यावेळी मुलांना विनामूल्य बग्गी राइड, उंटाची सवारी करण्यात आली. यावेळी लहान मुलांना सांताक्लॉजच्या हस्ते चॉकलेट, गोळ्या, बिस्कीट, पॉपकॉर्न आदी खाऊचे वाटप करण्यात आले. या ठिकाणी पाणीपुरी, भेळपुरी, रगडा पॅटिस,मसाला डोसा आदी खाद्यपदार्थांचा आनंद लुटला. या कार्यक्रमाचे संयोजन अमित बागूल, सागर बागूल, विकी खन्ना, महेश ढवळे यांनी यशस्वीपणे केले. या कार्यक्रमानिमित्त वसंतराव बागूल उद्यान सजविण्यात आले होते. त्यासाठी सगळीकडे विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

