नवी मुंबई -आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा नुकतीच करण्यात आली असून या महोत्सवाचे हे ३ रे वर्ष आहे. अल्पकालावधीत नावारूपाला आलेला हा महोत्सव या वर्षी मोठ्या दिमाखात होणार आहे. पाठीमागच्या वर्षी या महोत्सवात एक नव्हे दोन नव्हे तब्बल ७५ देशातून ४१० चित्रपटांनी सहभाग घेतला होता. या वर्षी साधारण १०० देशातून १००० चित्रपट येतील असे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संस्थापक – अध्यक्ष सचिन खन्ना यांनी अशी माहिती दिली.
हा चित्रपट महोत्सव डिसेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात होणार आहे. या चित्रपट महोत्सवासाठी प्रवेशिका उप्लबद्ध झाल्या असून सर्व भाषेतील तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपटांना देखील यात सहभागी होता येईल. पण त्यासाठी चित्रपटाची उपशीर्षके ( सबटाईटल ) असे बंधनकारक आहे. विविध श्रेणींमध्ये निवडल्या गेलेल्या व विजेत्या चित्रपटाला रोख रक्कमव सन्मानचिन्ह दिले जाईल. तरुण चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्याचा मुख्य हेतू हा या चित्रपट महोत्सवाचा आहे.असे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक व राष्ट्रीय फिल्म विजेत्या ‘ फिल्मीस्तान’ चित्रपटाचे सर्जनशील निर्माते अशोक पुरंग यांनी सांगितले.
अनेक चित्रपट क्षेत्रातील दिग्गज तसेच चित्रपट व्यावसायिक गेल्या वर्षी होते. त्याच बरोबर शहरात प्रथमच सुमारे 15 परदेशी चित्रपट तसेच निर्मात्ये अमेरिका, इटली, रशिया इत्यादी देशातील उपस्थित होते. इटालियन आणि रशियन दूतावासांनी पाठीमागच्या वर्षी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी भागीदार आणि समर्थक होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटांसाठी विशेष विभाग केला आहे. याचा महत्वाचा हेतू प्रादेशिक चित्रपटला चालना व प्रेरणा देण्याचा आहे. मराठी, हिंदी व अन्य भाषेतील चित्रपटांनी यात सहभाग घ्यावा असे आवहान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी कृपया contact@nmiff.com व jansamparkms@gmail.com यावरती संपर्क करावा.

