यंदाच्या वर्षी माझ्या संपूर्ण कुटुंबासोबत आमच्या फार्महाऊसवर एकत्र जमून सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करणार आहोत. असे अभिनेता राकेश बापट याने सांगितले , तो म्हणाला ,’ माझ्या घरच्यांसोबत वेळ घालवल्याचाही आनंद आणि नव्या वर्षाचं सेलेब्रिशन करता येईल. नवीन वर्षातील पहिल्या दिवसाचा सूर्योदय पाहण्याचा आम्ही बेत आखला आहे. त्याचसोबत २०१६ वर्षाचं रिजोल्यूशन सुद्धां मी केलं आहे. यावर्षी मी माझ्या कामाचं आणखी चांगल्यारीतीने प्लानिंग आणि त्याचं काटेकोर पद्धतीने पालन करणार आहे. गेल्या वर्षी माझं शेड्यूल्ड खूप मोघम होतं ज्यामुळे माझी रोजची कामं बऱ्याच प्रमाणात विस्कळीत होती. त्या गोष्टीची काळजी मी यावेळेस पुरेपूर घेणार आहे. येत्या वर्षात ५ फेब्रुवारी रोजी माझा ‘वृंदावन’ हा सिनेमा प्रदर्शित होतोय. या सिनेमात मी पहिल्यांदाच अॅक्शनसीन दिले आहे जे पाहताना प्रेक्षकांना राकेश बापट एका वेगळ्याच रुपात पाहायला मिळेल.