पुणे, : पुणे परिमंडलातील कृषीपंपाच्या नवीन वीजजोडणीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर
ज्या कृषीपंपधारकांना डिमांड नोट (फर्म कोटेशन) मिळालेली नाही त्यांनी संबंधीत उपविभाग
कार्यालयांत दि. 25 फेब्रुवारीपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन महावितरण केले आहे.
कृषीपंपाच्या नवीन वीजजोडणीसाठी अर्ज करूनही अद्याप (डिमांड नोट) फर्म कोटेशन
मिळालेले नाही, अशा तक्रारी असणार्या कृषीपंपधारकांना फर्म कोटेशन देण्यात येणार आहे. त्यानंतर
कृषीपंपधारकांना शक्य तेवढ्या लवकर नवीन वीजजोडणी देण्याचा महावितरणकडून प्रयत्न करण्यात येणार आहे
कृषीपंपाच्या नवीन वीजजोडणीसाठी अर्ज सादर केल्याचा पुरावा (अर्जावरील महावितरणचा
शिक्का) सादर करणे आवश्यक आहे. पुणे परिमंडलातील अशा कृषीपंपधारक शेतकर्यांनी संबंधीत
उपविभाग कार्यालयात दि. 25 फेब्रुवारीपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.