नवग्रह जैन सेवा मंडळाच्यावतीने आदिनाथ सोसायटीजवळील श्री. आदिनाथ स्थानकवासी जैन भवनमध्ये ” जैन जागरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . या शिबिराचे उद्घाटन श्री. नयनपद्मसागरजी महाराज यांच्यावतीने करण्यात आले . यावेळी नवग्रह जैन सेवा मंडळाचे अध्यक्ष किशोर जैन , मितेश जैन , पंकज परमार , अतिन राठोड , सचिन ओसवाल , शितल जैन , जितेंद्र जैन , आनंद जैन , प्रीतम गांधी , बंटी गांधी , चेतन सोनिग्रा , राजू ओसवाल . विनय पोरवाल , वसंत ललवाणी आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते .
यावेळी श्री. नयनपद्मसागरजी महाराज यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि , युवकांनी एकत्रित येउन समाजाच्या प्रवाहात आले पाहिजे , युवकांची ताकद समाजाला , देशाला पुढे नेऊ शकते . युवकांच्या हाती देशाचे भवितव्य आहे . त्यामुळे आपण पुढे येउन समाजासाठी चांगले काम करू शकला तर देश प्रगतीची शिखरे गाठू शकेल . सध्या युवकावर पाशात्य संस्कृतीचे भूत बसले आहे . त्यासाठी आपण सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे कि , देव , गुरु , और धर्म यांच्या माध्यमातूनच समाजात परिवर्तन घडू शकते .
यावेळी श्रावण आरोग्यम २ – उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले . श्रावण आरोग्यम हि एक आरोग्याची पॉलिसी असून त्यामध्ये जास्तीत जास्त आरोग्य सुविधा कमीत कमी खर्चात मिळणार आहे . त्यासाठी जास्तीत समाजबांधवानी या . श्रावण आरोग्यम या आरोग्याची पॉलिसी लाभ घ्यावा . यामध्ये व्यापारी , चार्टर्ड अकौटट , वकील , डॉक्टर या सर्वांनी एकत्रित आणून या समाज कार्यासाठी काम करणार आहे .