पुणे-भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शाब्दिक कोट्या करीत त्यांची खिल्ली उडवीत मनसे आणि कॉंग्रेस ने ; तर, ‘मी नाही त्यातली …’ ची दुटप्पी भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेस ने ‘स्मार्ट सिटी ‘ प्रकल्पाला अक्षरशः पुण्याबाहेरचा रस्ता दाखविला.
या प्रकरणात महापालिका आयुक्त यांची मात्र मोठी नैराश्यमय -दुर्धर अवस्था झाली . तर महापौर यांची ‘असून अडचण नसून खोळंबा ‘ अशी स्थिती झाल्याचे महापालिकेच्या खास सभेत स्पष्ट दिसून आले .७७ विरुध्द ३३ अशा मतदानाने हि सभा ४ जानेवारी पर्यंत तहकूब करण्यात आली . केंद्र शासन पुरस्कृत स्मार्ट सिटी अभियानांतर्गत पुणे शहराचा स्मार्ट सिटी प्रस्ताव आणि अहवाल राज्य शासना मार्फत केंद्र शासना कडे पाठविण्यास मान्यता द्यावी अशी मुख्य सभेकडे शिफारस करणारा महापालिका आयुक्तांचा प्रस्ताव या सभेत मांडण्यात आला होता. १५ डिसेंबर हि हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची अंतिम मुदत आहे .
आज सकाळी अकरा वाजता महापालिकेची खास सभा महापौर दत्ता धनकवडे यांच्या अध्यक्षतेखाली सुरु झाली . यावेळी हा प्रस्ताव मान्य करावा म्हणूनआयुक्त कुणाल कुमार यांनी प्रत्येक गटनेत्यांकडे विनंती चालविली होती . कॉंग्रेसचे संजय बालगुडे यांनी ‘आम्ही विवेकानंद नाही नजर फिरली कि सारे काही लक्षात यायला किमान अभ्यासासाठी १ महिन्याचा अवधी द्या अशी मागणी केली मनसे चे बाळा शेडगे यांनी महापौर हा प्रस्ताव मान्य करण्याची घाई का करता ?भाजपचा अजेंडा तुम्ही राबवू नका असे सांगितले राजू पवार म्हणाले आता एक तासात तुम्ही काय स्मार्ट सिटीचे सादरीकरण करणार ?स्मार्ट सिटी च्या नावाने .. इस्ट इंडिया कंपनीप्रमाणे काही कंपन्या शिरकाव करू पाहत असल्याचा आरोप त्यांनी केला . किशोर शिंदे , बाळा शेडगे , राजू पवार , रुपाली पाटील आदी मनसे नगरसेवकांनी आयुक्तांवर यावेळी भाजपचे एजंट असल्याचा आरोप करीत त्यांचा धिक्कार करणाऱ्या घोषणा सुरु केल्या भाजपचे गणेश बिडकर यांनी यावेळी ‘यांना फक्त टक्केवारीचे राजकारण समजते असा आरोप केल्याने ‘नाही चलेगी भाजपची एजंट गिरी ‘ अशा घोषणांना मनसे ने प्रारंभ केला याच वेळी सभागृह नेते राष्ट्रवादी सदस्य बंडू केमसे यांनी ४ जानेवारी दुपारी ३ वाजेपर्यंत आजची सभा तहकूब करावी अशी तहकुबी वाचली . या दरम्यान आयुक्त कुणाल कुमार खूप तणावात दिसत होते . गणेश बिडकर , सुभाष जगताप , आबा बागुल , वसंत मोरे आदींशी ते वारंवार बोलत होते अधून मधून महापौर आणि आयुक्त यांचे मोबाईलवर जणू काही बाहेरच्या कोणाशी संवाद होत असावेत असे दिसत होते . अखेर थोड्या वेळाने चेतन तुपे यांनी तहकुबी चे पत्र आणून दिले .बाबू वागस्कर आणि शेडगे यांच्या आग्रहानंतर नगरसचिव सुनील पारखी यांनी हे पत्र वाचून दाखविले आणि त्यानंतर त्यावर भाषणे सुरु झाली .
यावेळी आपल्या भाषणातून बाळा शेडगे यांनी थेट पंतप्रधानांवर हल्ला केला , ते म्हणाले , ‘ मध्यंतरी ते बिहार मध्ये गेले , तिथे म्हाणाले , कितने चाहिये ? दस हजार करोड , बीस हजार करोड .. तीस हजार करोड …. अशी बोली लावणाऱ्याला तिथे आपली जागा कळली . स्मार्ट सिटीच्या नावाखाली ५०० करोड चे गाजर दाखवून पुणेकरांच्या खिशातून ३ हजार करोड काढण्याचा डाव असेल तर तो कदापि यशस्वी होवू देणार नाही . वेगवेगळ्या विकासाची स्वप्ने दाखवून वेगवेगळ्या कंपन्या च्या हाती सत्ता देण्याचे कारस्थान चालू देणार नाही . पुणेकरांना वेडे बनविण्याचा प्रयत्न करू नका . किशोर शिंदे म्हणाले .’स्मार्टसिटी हि केवळ राजकीय नौटंकी च आहे नव्या करांचा बोझा पुणेकरांना नको आहे . बाबू वागस्कर म्हणाले , सरकारने जकात बंद केली एल बीटी बंद केली आता विविध कंपन्यांना पुढे आणीत आहे कंपन्या अधिकारी यांच्या हाती अधिकार राहतील आणि लोकप्रतिनिधी शोभेची बाहुली बनतील असे काही कृत्य होवू नये , वनिता वागस्कर यांनी यावेळी अशा प्रकल्पांनी महापालिकेचे अधिकार आणि अस्तित्व धोक्यात आणण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप केला
कॉंग्रेस चे सदस्य आणि उपमहापौर आबा बागुल यांनी तर तहकुबीवरील भाषण लिहूनच आणले होते . त्यामुळे सारे पूर्वनियोजितच आहे कि काय ?असा प्रश्न येथे निर्माण झाला होता . त्यांनी आपल्या भाषणातून नरेंद्र मोदींनाच लक्ष्य केले . ‘ मन कि बात छोडो ..काम कि बात करो … मन कि बात , म्हणून , म्हणून छुपा व्यापारी हिताचा अजेंडा राबवू नका . बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या चौकटीत निर्माण केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था चे अस्तित्व धोक्यात आणण्याचा प्रयत्न अशा पद्धतीने होत असल्याचा अप्रत्यक्ष आरोप करून पुणे शहर आपला विकास आपल्या पायावर उभे राहून भक्कमपणे करेल असेही ते म्हणाले
मुक्ता टिळक आणि मंजुषा नागपुरे यांनी यावेळी , पंतप्रधानांवरील टीका म्हणजे भाजपच्या प्रत्येक कार्य कर्त्यावरील टीका आहे असे यावेळी म्हटले तेव्हा बाबू वागस्कर यांनी , नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत कि भाजपचे ? असा सवाल केला
सभा तहकुबी मांडणाऱ्या राष्ट्रवादीचे बंडू केमसे यांनी ,’ आमचा स्मार्ट सिटी ला पाठींबा आहे कृपया गैरसमज करून घेवू नका असे धक्कादायी विधान केले आणि आभ्यासाला वेळा द्यायला हवा , स्मार्त सिटी झालीच पाहिजे असे हि नमूद केले .
भाजपचे गणेश बिडकर यांनी पाहिजे तर ११ तारखेपर्यंत अभ्यासाला वेळा घ्या पण हा प्रस्ताव मंजूर करा सभा ११ तारखेपर्यंत तहकूब करा अशी विनंती वारंवार केली . ते म्हाणाले या प्रकल्पाने महापालिकेचे कोणतेही अधिकार धोक्यात येत नाहीत आणि कोणतेही कर वाढणार नाहीत . पण हा प्रस्ताव नाकारून आपण शहराला जागतिक पटलावर नेण्याची संधी डावलतो आहे .मुक्ता टिळक म्हणाल्या शहराला २४ तास पाणी , स्वच्छता , सुरळीत वाहतूक हवी आहे ,या शहरात अनेक कंपन्या आपले योगदान देण्यासाठी पुढे येत आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावरही स्मार्त सिटी प्रकल्पाचे कौतुक होते आहे या प्रकल्पासाठी पुण्याची निवड झाली हा पुण्याचा बहुमान आहे . काहीही माहिती न घेता , प्रकल्प समजावून न घेता यास विरोधासाठी विरोध करून आरडा ओरडा करू नये मंजुषा नागपुरे यांनीहि हा प्रस्ताव समजून घ्या , माहिती घ्या , शंका निरसन करवून घ्या पण डावलू नका असे आवाहन केले
एकंदरीत काँग्रेस-राष्ट्रवादी – मनसे – आरपीआय यांनी तहकुबीला पाठींबा देत भाजपला एकाकी पाडून स्मार्ट सिटी प्रकल्पाला महापालीकेबाहेरचा रस्ता दाखविला आहे .

