पुणे- सिद्धार्थ च्या अकाली जाण्यांनंतर …. किशोरदांनी मला लग्नाची अप्रत्यक्ष मागणी घातली होती पण मी ती नाकारली , आणि एके दिवशी माझे वडील मला कशाबद्दल तरी बोलले रागावले … आणि मी किशोरदा यांना फोन केला . आणि लग्नाचे विचारले ; तेव्हा ते म्हटले हा विषय तर संपला होता. तेव्हा मी त्यांना म्हटले ,’ मला इथे नाही राहायचे.तुम्ही नाही म्हणत असाल ,तर मी इतर कोणाला विचारेल … मग आमचे ठरले त्यात हि खूप गमती घडल्या . मी म्हटले आई तर तयार होईल पण वडील ऐकणार नाहीत… किशोरदांचे अगोदरची लग्ने हे त्याला कारण होते . मग आम्ही लग्न करून धारवाड ला गेलो तेव्हा आई आणि भाऊ भेटले पण वडील बाहेर येईनात . तेव्हा किशोरदांनी तेथील चटई ओढली ; हार्मोनियम घेतला काही गाणी गायली पण वडील बाहेर येईनात तेव्हा ते म्हटले आता ब्रम्हास्त्र पहा … मग त्यांनी ‘नफरत करनेवालो के सीनेमे प्यार भर दू … हे गाणे गावून वडिलांची नाराजी दूर केली -हे गाणे गातच वडील बाहेर आले आणि म्हणाले… बस हीला आता सुखी ठेव …. ऐका लिनाजींच्या आवाजात …