पुणे-येत्या १ जानेवारीला प्रदर्शित होणारा बहुचर्चीत ”नटसम्राट’ ‘ च्या कलावंतांचा संच आणि झी मराठीवरील ‘चला हवा येवू द्या ‘ चा जोरदार कार्यक्रम अशी पर्वणी परवा बुधवारी २३ तारखेला पुणेकरांना बालेवाडी क्रीडासंकुलात उपलब्ध झाली आहे .येथे विनोदाचे वादळ घेवून येणारे ” डॉ. निलेश साबळे , भाऊ कदम , भारत गणेशपुरे , कुशल बद्रिके ,सागर कारंडे,आणि विनीत बोंडे आज पुण्यात दाखल झाले . चला हवा येवू द्या या कार्यक्रमाचा सध्या महारष्ट्र दौरा सुरु आहे . पनवेल पासून सुरु झालेला हा दौरा सुमारे २ महिने चालणार आहे . या पूर्वी कोल्हापूर सांगली येथे कार्यक्रम करून आल्यावर आता परवा पुण्यात हा जंगी कार्यक्रम होतो आहे .ज्याचे भाग २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी झी मराठीवर प्रदर्शित होणार आहेत . नटसम्राट मधील नाना पाटेकर , मेधा मांजरेकर , सुनील बर्वे , नेहा पेंडसे , मृण्मयी देशपांडे , तसेच महेश मांजरेकर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत . बालेवाडी ची थुरकटवाडी कशी होते ते आता बुधवारीच समजणार आहे . दरम्यान या थुरकट वाडीतील कलाकार कुशल बद्रिके आज पुण्यात काय म्हणाला ते पहा ….
‘नटसम्राट’च्या कलाकारांसह ‘चला हवा येवू द्या ‘बुधवारी बालेवाडीत …
Date:

