‘नच बलिये ‘ अमृता खानविलकर व हिमांशू मल्होत्रा विजेते
मुंबई – नच बलिये या रिएलिटी शोमध्ये मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर व हिमांशू मल्होत्रा या जोडीने विजेतेपद पटकावले आहे. सचिन पिळगावकर – सुप्रिया यांच्यानंतर नच बलियेत बाजी मारणारी अमृता दुसरी मराठी कलाकार ठरली आहे.
वाजले की बारा या लावणीने चाहत्यांची मनात स्थान पटकावणारी अमृता खानविलकर व हिमांशू मल्होत्रा ही जोडी नच बलिये या शोमध्ये सहभागी झाले होते. शोच्या पहिल्या टप्प्यापासूनच अमृता – हिमांशूच्या जोडीने दमदार नृत्यामुळे प्रेक्षक व परिक्षकांची वाहवा मिळवली होती. या शोची महाअंतिम फेरी रविवारी पार पडली असून या फेऱीत नृत्य व त्याला प्रेक्षकांनी दिलेला भरभरुन प्रतिसाद या आधारे अमृता – हिमांशू या जोडीने विजेतेपद पटकावले. त्यांना ३५ लाख रुपये रोख व एक गाडी पारितोषिक म्हणून देण्यात आले. रश्मी – नंदीश ही जोडी दुस-या तर करिष्मा तन्ना व उपेन पटेल या जोडीला तिस-या स्थानावर समाधान मानावे लागले. नच बलियेत ले.