पुणे, दि. 02 : नगररोड विभाग अंतर्गत वीजमीटरच्या विशेष तपासणी मोहिमेत 16 ठिकाणी 2 लाख 32 हजार रुपयांची वीजचोरी तर 5 ठिकाणी 1 लाख 97 हजार रुपयांच्या विजेचा अनधिकृत वापर आढळून आला.
नगररोड विभाग अंतर्गत नुकतीच वीजमीटरची विशेष तपासणी मोहीम झाली. यात नगररोड उपविभागात 11 ठिकाणी 1 लाख 20 हजार रुपयांची वीजचोरी आढळून आली. वडगाव शेरी उपविभागात 2 ठिकाणी 3 हजारांची वीजचोरी तर 3 ठिकाणी 1 लाख 74 हजार रुपयांच्या विजेचा अनधिकृत वापर दिसून आला. विश्रांतवाडी उपविभागात 3 ठिकाणी 82 हजारांची वीजचोरी तर 2 ठिकाणी 23 हजार रुपयांच्या विजेचा अनधिकृत वापर आढळून आला. वीजचोरी प्रकरणी कलम 135 अन्वये तर अनधिकृत वीजवापर प्रकरणी कलम 126 अन्वये कारवाई करण्यात येत आहे.
——————————————————————-
वीजग्राहक दिनात 25 तक्रारी दाखल
पुणे, दि. 02 : महावितरणच्या दरमहा वीजग्राहक तक्रार निवारण दिनाच्या उपक्रमात बुधवारी (दि. 2) पुणे परिमंडलातील विभागीय कार्यालयांत प्राप्त झालेल्या एकूण 25 पैकी 08 तक्रारी तत्काळ निकाली काढण्यात आल्या. उर्वरित 17 तक्रारींच्या निवारणासाठी संबंधित उपविभाग कार्यालयांकडून कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी सर्व विभाग कार्यालयांत ग्राहक तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात येत आहे.


