पुणे-
पर्णकुटी चौक येरवडा ते खराडी जकात नाक्यापर्यंतचा सुमारे ९ किलोमीटर अंतराचा बी.आर.टी. जलद बस
वाहतुक (मार्गिका) मार्ग येत्या २६ जानेवारी २०१६ रोजी खुला करण्यात येईल असे महापालिका आयुक्त कुणाल
पुणे महापालिका मुख्य भवनातील महापालिका आयुक्त सभागृहात मा. महापालिका आयुक्त कुणाल कुमार
यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
सदर बैठकीत पर्णकुटी चौक येरवडा ते खराडी जकात नाक्यापर्यंतच्या बी.आर.टी. जलद बस वाहतूकी
संदर्भात आढावा घेण्यात आला.
सदर बैठकीस अति.महा.आयुक्त (वि) ओमप्रकाश बकोरिया, पीएमपीएलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी
श्रीमती मयुरा qशदेकर, तहसीलदार श्री. कुंभार, मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त सतीश कुलकर्णी,
सहमहापालिका आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, अधिक्षक अभियंता नामदेव बारापात्रे, पोलिस वाहतुक विभागाचे निरीक्षक
श्री. राजकुमार शेरे, अधिक्षक अभियंता विजय qशदे व अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बसमार्गातील अंतिम टप्प्यातील राहिलेल्या विविध कामकाजाचा याप्रसंगी आढावा घेण्यात आला. तसेच
उर्वरीत सर्व कामे युध्दपातळीवर पूर्ण करण्याचे तसेच बस टर्मिनलकरिता आवश्यक नियोजन करण्याचे आदेश
महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी संबंधित अधिकाèयांना दिले.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व विश्रामबाग क्षेत्रिय
कार्यालयाचे वतीने स्वच्छता अभियान
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व पुणे महानगरपालिकेच्या विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालयाच्या
वतीने स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले.
अभिनव कला विद्यालय ते शनिवारवाडा तसेच शनिवारवाडा ते जेधे चौक, स्वारगेट व शनिवारवाडा
सभोवतालच्या परिसरामध्ये स्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छतेविषयक कामे, झाडणकाम करण्यात आले व सुमारे
२२ टन कचरा काढण्यात आला.
अभियाना अंतर्गत डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सुमारे ३९६ स्वयंसेवक व विश्रामबागवाडा क्षेत्रिय
कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच आवश्यक साधनसामुग्री व वाहने उपलब्ध करुन देण्यात आले होते.
या उपक्रमा संदर्भात केलेल्या सहकार्याबद्दल व स्वच्छता अभियानाबाबत विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालयाचे
वतीने डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे लेखी पत्राद्वारे आभार व्यक्त करण्यात आले.