पुणे – संथारा व्रत म्हणजे आत्महत्या .. असा निर्णय राजस्थान उच्च न्यायालयाने दिल्यानंतर सकाळ जैन समाज एकवटला आणि सर्व धर्मातील अशा रिती रिवाजांचे संरक्षण व्हावे अशी मागणी करीत पुण्यातील विधानभवनावर धडकला ऍड. एस. के. जैन ,डॉ. कल्याण गंगवाल, फत्तेचंद रांका अशा जैन समाजातील मान्यवरांसह हिंदू धर्म विद्वत्त्ते यांनी हि देहाचा त्याग हा स्वेच्छेने करणाऱ्या धार्मिक परंपरा जतन केल्या पाहिजेत अशी भूमिका घेतली आहे जैन धर्मात संथारा, सल्लेखना व्रत म्हणजे ब्रह्मलिन होणे आहे; परंतु संथारा व्रत ही आत्महत्या असल्याचा निर्णय राजस्थान उच्च न्यायालयाने दिला आहे. तो अत्यंत दुर्दैवी असल्याने, केंद्र सरकारने सर्वधर्मांतील पद्धतींचे व रीतिरिवाजांचे संरक्षण व्हावे म्हणून स्वतंत्र कायदा करावा, अशी मागणी सकल जैन समाजाने सोमवारी मूक मोर्चा काढून केली असून, न्यायालयाच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली.
ओसवाल बंधू समाज चौक येथून विधान भवनापर्यंत काढलेल्या मोर्चात हजारोंच्या संख्येने जैन समाजाबरोबरच अन्य धर्मीयांनी भाग घेतला. जैन समाजाने संथारा व्रत पवित्र मानले असून, ही अनेक वर्षांपासूनची पंरपरा आहे. त्याबाबत पंतप्रधान, केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री व मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नी लक्ष घालावे म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश जाधव यांच्याकडे निवेदन देण्यात आले. जैन धर्माचे साधू प.पू. मणिभद्र मुनीजी, प.पू. रमणिक मुनीजी, प.पू. सुरेश्वर म.सा., साध्वी अर्चना, साध्वी संतोष, साध्वी अनुपमा यांसह चार पंथांतील साधू-साध्वी, विजयकांत कोठारी, फत्तेचंद रांका, पोपटलाल ओस्तवाल, मिलिंद फडे, अचल जैन, ऍड. एस. के. जैन, चंद्रकांत छाजेड, अभय छाजेड, डॉ. कल्याण गंगवाल, महावीर कटारिया, प्रवीण चोरबेले, लक्ष्मीकांत खाबिया, महेंद्र पितळीया, अमितचंद संघवी, अशोक हिंगड, महेंद्र जैन, विपुल शहा मोर्चात सहभागी झाले होते.
डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “”संथारा व्रत म्हणजे प्रतिष्ठेने मरण (डाईंग वुईथ डिग्निटी) असे आहे. अन्नत्यागातून देहत्याग करणे विज्ञानालाही मान्य आहे. अशा पद्धतीने आत्म्याशी लिन होऊन व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो, अशी शिकवण जैन धर्मात आहे, त्यामुळे संथारा व्रताला परंपरा आहे.‘‘
ऍड. एस. के. जैन म्हणाले, “”इच्छामरण हे धार्मिक संकल्पनेवर आधारित आहे. देहत्याग हा गुन्हा ठरविणे दुर्दैवी आहे. केंद्राने या कायद्यात बदल करावा. धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक परंपरेनुसार संथारा व्रत कायम ठेवावे.‘‘ फत्तेचंद रांका म्हणाले, “”भारतीय घटनेने संथारा व्रताला मान्यता दिली. मात्र, ती आत्महत्या नाही. विविध धर्मांतील परंपरांचे रक्षण होण्याची गरज असल्याने केंद्राने सर्वधर्मीयांबाबत स्वतंत्र कायदा करावा.‘‘
पं. वसंत गाडगीळ यांनी असे म्हटले आहे कि हा केवळ जैन समाजाचा मोर्चा नाही. देहाचा त्याग हा स्वेच्छेने करता येतो. आद्य शंकराचार्यांपासून ते संत ज्ञानेश्वरांपर्यंत अनेकांनी स्वतःहून ही परंपरा जपली. देहत्याग करणे म्हणजे परमेश्वराशी एकरूप होणे होय. त्यामुळे सरकारने भारतीय संस्कृतीचे जतन करावे.