धनगर समाजाचा गौरवशाली इतिहास जगासमोर यावा :हरी नरके
इतिहास घडविण्यासाठी लढतोय :महादेव जानकर
पुणे :
धनगर हा पशुपालक समाज इतिहासाच्या आधीपासून आहे ,त्याच्याच इतिहासाकडे दुर्लक्ष होता कामा नये ,मौर्य -हरिहर -बुक्क -सातवाहन -होळकरांपासून सर्व गौरवशाली इतिहास जगासमोर आला पाहिजे ‘ असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांनी केले
संजय सोनवणी लिखित धनगरांचा गौरवशाली इतिहास ‘ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते . राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर ,’ ख्वाडा ‘ चे दिग्दर्शक भाऊराव कुऱ्हाडे ,लेखक होमेश भुजाडे ,प्रकाश खाडे ,गोपीचंद पडळकर उपस्थित होते
महाराजा यशवंत राव होळकर गौरव प्रतिष्ठान आयोजित हा प्रकाशन समारंभ उद्यान प्रसाद मंगल कार्यालय येथे रविवारी झाला . यावेळी भाऊराव कुऱ्हाडे यांचा यशवंत राव होळकर पुरस्कार देवून गौरव करण्यात आला
हरी नरके म्हणाले ,’ पशु पालक समाज आधीपासून आहे . महाराष्ट्रात सुद्धा २ हजार वर्षापासून सातवाहन राजांनी मराठीतील पहिले पुस्तक तयार केले . १२ बलुतेदारांना रेटण्याची वृत्ती असून हे मारेकरीच बहुजनांच्या वेशात येत असल्याने बहुजनांची फसगत होत आहे . पण ,यातून बाहेर पडून नवा इतिहास रचण्याची गरज आहे ‘
महादेव जानकर म्हणाले ,’ इतिहासाबद्द्दल मी फार बोलणार नाही . मात्र नवीन इतिहास घडविण्य साठी कार्यरत राहणार आहे . धनगर समाज पैशाने श्रीमंत होण्यापेक्षा ज्ञानाने श्रीमंत होण्याची गरज आहे . मी मंत्री पदासाठी काम करीत नसून नवीन इतिहास घडविण्यासाठी कार्य करीत आहे . या वाटचालीत मला धनगारान बरोबर इतर समाजाचे योगदान मिळाले आहे
संजय सोनवणी म्हणाले ,’ निपक्ष इतिहास लिहून आत्मभिमान जागृत केला पाहिजे . स्वताकडे पाहण्याची न्यून गन्डाची दृष्टी बदलून धनगर समाजाने सर्व क्षेत्रातील नव्या कार्यासाठी सिद्ध झाले पाहिजे .
धनगर समाजावर विज्ञान वादी संस्कार रुजवले पाहिजेत असे लेखक होमेश भुजाडे म्हणाले