Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

धनगरवाडा – समाजासमोर कधीही न आलेलं दाहक वास्तव

Date:

देशाला स्वातंत्र्य मिळून आज 68 वर्षांचा काळ लोटला. विज्ञान-तंत्रज्ञानाने आकाश गाठले. पण जाती-पातीचे राजकारण, रुढी-परंपरांना चिटकलेला, जातपंचायतीसारख्या समांतर न्यायव्यवस्थेला बळी पडलेला धनगर समाज आजही उपेक्षित, दुर्लक्षित आणि सोशिक राहिला आहे. एकेकाळी धनगर समाजात जन्मलेल्या महापुरुषांनी आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्र गाजवला. पण, होळकर घराण्यातील शुरवीरांचे रक्त वाहत असलेल्या ह्या धनगर समाजाला आज ग्लानी आली आहे. एकूण बावीस पोटजातीत विभागलेला निमभटका धनगर समाज आपल्या शेऴ्यामेंढ्यांसह डोंगरकपाऱ्यांत वास्तव्य करून आहे. परंतु आजही प्रशासन आणि तथाकथित उच्चवर्णीय तसंच सावकारांकडून होणारे अमानवी अत्याचार मेंढरांप्रमाणे मुकाट सहन करीत आहे. अशा अन्यायाला वाचा फोडणारा राम-लक्ष्मण प्रॉडक्शन निर्मित ‘धनगरवाडा’ हा सिनेमा येत्या 27 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

index1index2

कथालेखक विजयकुमार दळवी यांच्या ‘धनगरवाडा’ या गाजलेल्या कादंबरीवर आधारीत ह्या सिनेमात ज्येष्ठ अभिनेते स्व. सदाशिव अमरापूरकर यांनी ‘झिमू’ या जातपंचायतीच्या प्रमुखाची भूमिका साकारली आहे. धनगरवाडा हा त्यांचा अभिनय केलेला शेवटचा सिनेमा. प्रकृती साथ देत नसतानाही त्यांनी कठीण परिस्थितीत चित्रीकरण पूर्ण केले. सिनेमाची गोष्ट महाराष्ट्रातील डंगे धनगर समाजाची आहे.

सदाशिव अमरापुरकर यांच्यासोबत वरद विजय चव्हाण, पल्लवी पाटील, मिलिंद गवळी, गणेश यादव, माधव अभ्यंकर, सहासिनी देशपांडे, पूजा पवार, जयवंत वाडकर आणि गणेश आगलावे यांच्या प्रमुख भूमिका आहे. यंदाच्या राज्य चित्रपट पुरस्कारात ह्या सिनेमाचे संगीत दिग्दर्शक परिक्षीत भातखंडे यांना सर्वोत्कृष्ट संगीतकार आणि अभिनेत्री पल्लवी पाटील यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- प्रथम पदार्पण आदी पुरस्काराने गौरविण्यात आले. गीतकार बाबा चव्हाण यांची मधूर गीतरचना आणि पटकथा-संवाद अनिल सपकाळ यांनी लिहीले आहेत.

अडीचशेहून अधिक चित्रपटांचं छायांकन केलेले ख्यातनाम सिनेमॅटोग्राफर समीर आठल्ये यांनी धनगरवाडाच्या निमित्ताने दिग्दर्शन क्षेत्रात पहिलं पाऊल टाकले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील चंदगड तालुक्यातील उंच डोंगरमाथ्यावर घनदाट जंगलात वसलेल्या एका धनगरपाड्यावर या चित्रपटाचं शुटींग पूर्ण झाले. त्यामुळे चित्रपटाला लाभलेला एक वेगळाच नैसर्गिक ताजेपणा डोळ्यांना नक्कीच सुखावेल, असं समीर आठल्ये यांनी सांगितले.

अलका कुबल-आठल्ये – शिल्पा मसुरकर प्रस्तुत आणि विजयकुमार दळवी – प्रकाश मसुरकर निर्मित धनगरवाडा हा सिनेमा २७ नोव्हेंबर पासून महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. पुढे वर्षभर महाराष्ट्रात आणि सीमाभागातील धनगर समाजाच्या जवळपास सव्वाशे जत्रांमध्ये दाखवला जाणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...