देशात खऱ्या अर्थाने घटना ज्या दिवशी स्वीकारेल त्यावेळेस जातीय निर्मुलन होईल , असे प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी केले . पुणे कॅम्प भागातील नेहरू मेमोरिअल हॉलमध्ये जवखेडा , सोनाई , खैरलांजी , पंढरपूर , खर्डा , जामखेड , शिर्डी , दलित आदिवासी अल्पसंख्याकावरील अत्याचाराविरोधात फक्त चर्चा नव्हे , कृतीशील आव्हान ? आत्म सन्मानासाठी ” आत्मसवांद ” या कार्यक्रमात उद्घाटन डॉ. बाबा आढाव यांच्याहस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करून करण्यात आले . त्यावेळी त्यांनी आपले विचार मांडताना सांगितले कि , खऱ्या अर्थाने शिक्षण पध्दतीत आमुलाग्र बदल केले पाहिजे , घटनेच्या मार्गदर्शकात तत्त्वात विज्ञाननिष्ठा धोरण स्वीकारले पाहिजे , घटनेचे शिक्षण घरापासूनच दिले गेले पाहिजे , देश घडविण्याचे कार्यक्रम झाले पाहिजे , त्यामध्ये भारतीय नागरिक घडविण्यासाठी न्यायाची समानता नाही , त्यासाठी आपल्याला भारत घडवायचा आहे महात्मा फुलेनी त्यांच्या प्रार्थनेतून समतेचे विचार पटवून दिले आहे . महाराष्ट्रातील सर्व शाळामधून हि प्रार्थना म्हणली पाहिजे असे त्यांनी आवर्जून सांगितले .
या कार्यक्रमास पदमश्री मिलिंद कांबळे , पत्रकार वैभव छाया , कलमनामाचे संपादक युवराज मोहिते , डॉ. अमोल देवळेकर , रॉबिन घोष , संभाजी भगत, मुश्ताक पटेल , भोलासिंग अरोरा , पुष्पा गाडेपाटील , इकबाल अन्सारी , जावेद खान आदी मान्यवर व फुले शाहू आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या सुरुवात संभाजी भगत यांच्या विद्रोही जलसाने झाली . या कार्यक्रमात महात्मा फुलेनी यांच्या सत्य सुखाचा आधार , बाकी सर्व अंधकार हि प्रार्थना सर्वांनी सामुहिकपणे म्हणली . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी केले तर आभार तेजस लोंढे यांनी मानले .