पुणे :
“महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्यूकेशन सोसायटी’च्या “छलांग’ या महत्वाकांक्षी “बुकलेस पायलट प्रोजेक्ट’चे 17 जून रोजी उद्घाटन होत आहे. सय्यद अब्दुल करीम (“नॅशनल कौन्सिल फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लॅग्वेज’ चे संचालक) यांच्या हस्ते सकाळी 9.30 वाजता हे उद्घाटन असेम्ब्ली हॉल, आझम कॅम्पस येथे होणार आहे, अशी माहिती “महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्यूकेशन सोसायटी’ चे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांनी दिली.
पी. ए. इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत “महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्यूकेशन सोसायटी’ ही संस्था संगणक, ई-लर्निंग च्या शिक्षणात नवा मानदंड तयार करीत आहे. संस्थेत शिपायांपासून, प्राचार्यांपर्यंत सर्वजण एम.एस.सी.आय.टी उत्तीर्ण आहेत. प्रत्येक विद्यार्थी इंटरनेटवर आहे.
यातील पुढील पाऊल म्हणून संस्थेच्या इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळेतील 7 वी, 8 वी च्या तुकड्यातील 220 विद्यार्थी आता “ई-टॅब’ वर शिकणार आहेत. या उपक्रमात शिक्षकांनाही शिकविण्यासाठी ई-टॅब देण्यात येणार आहेत. त्याचा प्रारंभ 17 जून रोजी होत आहे. हे सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रयोग करणारा भारतातला एकमेव कॅम्पस आहे, देशातील पहिला “ई-कॅम्पस’ होण्याकडे “एम.सी.ई सोसायटी’ची वाटचाल होत आहे. विद्यार्थी नव्हे पालकांनाही या सुटीत संस्थेने संगणक साक्षर केले आहे.’ असे पी.ए.इनामदार यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी : एक “ई- कॅम्पस’
- 158 एमबीपीएस क्षमतेचे ऑप्टीकल फायबर इंटरनेट नेटवर्क उपलब्ध.
- प्रत्येक विद्यार्थी, पालक, प्राचार्य, शिपाई एम.एच.सी.आय.टी परिक्षा उत्तीर्ण
- 550 शिक्षकांनी, 7124 विद्यार्थ्यांनी “एम.एस.सी.आय.टी परिक्षा कोर्स’ पूर्ण केला आहे. “कोर्स ऑन कॉम्पुटर कन्सेप्ट’ (CCC) या राष्ट्रीय पातळीवरील परिक्षेमध्ये 40 शिक्षक आणि 537 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुणे महानगरपालिका शाळेतील 104 विद्यार्थी CCC ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. तसेच पालिकेतील 74 विद्यार्थी एम.एस.सी.आय.टी परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
- पुण्याबाहेर एकूण 103 शिक्षक आणि 256 विद्यार्थी “पी ए इनामदार आय सी टी ऍकॅडमी’द्वारे एम.एस.सी.आय.टी परिक्षा उत्तीर्ण उपलब्ध
- पुणे महापालिकेसह महाराष्ट्रभर 44 ठिकाणी पी.ए.इनामदार संगणक प्रशिक्षण केंद्र उपलब्ध आहेत. या ठिकाणी एकूण 28 हजार विद्यार्थी संगणक प्रशिक्षण घेत आहेत.
- श्रमिक, क्रमिक पुस्तके डीजिटल फॉर्ममध्ये उपलब्ध
- वाय-फाय सुविधा उपलब्ध
- 7 वी- 8वी च्या विद्यार्थ्यांना ई-टॅब प्रशिक्षण उपलब्ध
- या सर्व उपक्रमांसाठी “पी.ए.इनामदार इंन्फरमेशन कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी ऍकॅडमी’चे 64 प्रशिक्षक आणि 31 इंग्रजी भाषा प्रशिक्षक कार्यकरत आहेत.
- “बुकलेस पायलट प्रोजेक्ट’कार्यक्रमाचा तपशील :
दिनांक 17 जून 2015 रोजी
वार: बुधवार
वेळ : सकाळी 9.30 वाजता
स्थळ: डॉ . ए आर शेख असेम्ब्ली हॉल, आझम कॅम्पस, पुणे