पुणे:-उद्योजक माणिकचंद दुगड यांनी कित्तेकांचे संसार उभे करतानाच धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातही वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद असून अनुकरणीय असल्याचे प्रतिपादन सुप्रिया सुळे यांनी केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृत महोत्सवाच्या पार्शभूमीवर दुगड यांचा विशेष सन्मान खा.सुळे यांच्या हस्ते करण्यात आला,त्यावेळी त्या होत्या. बिबवेवाडीत झालेल्या या कार्यक्रमास महापौर दत्तात्रय धनकवडे,जि. पी अध्यक्ष कंद आदीसह नगरसेवक अप्पा रेणुसे, विशाल तांबे,शिवलाल भोसले,डॉ सुनिता मोरे उपस्थिती होती.
पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या वतीने शहरातील अनेक नामवंत जेष्टांचा सत्कार करण्यात आला.उद्योग व धार्मिक शेत्रात कार्य करणाऱ्या दुगड यांचा विशेष सन्मान करण्यात आला.या वेळी दुगड परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.प्रमोद दुगड यांनी सर्वांचे स्वागत केले.



