ऐतिहासिक वारसा असलेल्या महात्मा फुले मंडईस वैभव प्राप्त करुन देण्याचा आणि गाडीखाना आरोग्य केंद्रही अलिशान बनविण्याची संकल्पना कास्ब्याचे राष्ट्रवादी पक्षाकडून ल;अध्णारे उमेदवार दीपक मानकर यांनी येथे मांडली . १ ऑक्टोबर या जागतिक ज्येष्ठ नागरिकदिनाचे औचित्य साधून दीपक मानकर यांनी मंडई येथील ज्येष्ठ गाळेधारकांशी सुसंवाद साधला. आणि आरोग्य केंद्रातील रुग्ण तसेच कर्मचारी यांची भेट घेवून चर्चा केली मंडई मधील श्रीमती सरस्वती भोक्से व शिवाजी काची या ज्येष्ठ गाळेधारकांनी मंडई येथील गाळेधारकांच्या समस्यांबाबतचे निवेदन मानकर यांना दिले.
जवळपास पाच दशकांचा इतिहास असलेली ही मंडई एकेकाळी पुण्याच्या आर्थिक व्यवस्थेचे प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होती. बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणार्या मंडईची आजमितीस अत्यंत दुरवस्था झालेली आपणास पाहावयास मिळेल. त्यामुळे येथील किमान ८0 टक्के गाळेधारक हे आपले मंडईमधील हक्काचे गाळे सोडून रस्त्यावर ठाण मांडून बसलेले दिसून येत आहेत.
हे चित्र बदलण्यासाठी महात्मा फुले मंडईचे मार्केटयार्ड येथील शिवाजी मार्केटयार्डच्या धर्तीवर नूतनीकरण करणे गरजेचे आहे. मुख्य मंडई, तसेच आजुबाजूच्या परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न आजमितीस ऐरणीवर आहे. नियमितपणे या संपूर्ण परिसराच्या स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे. या परिसरात महिलांसाठी अधिक प्रमाणात सार्वजनिक स्वच्छतागृहांची निर्मिती करणे, येथे व्यवसाय करणार्या सर्व गाळेधारकांना आवश्यक असलेल्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यास रस्त्यावर बसणार्या व्यावसायिकांचे प्रमाण आपोआप कमी होईल. त्यामुळे आज या संपूर्ण परिसरात होत असलेल्या दैनंदिन वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. सामान्य नागरिकांचा विशेषत: ज्येष्ठ नागरिकांचा या रस्त्यावरील व्यवहार सुसह्य होईल. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सुटेल.
महानगरपालिकेच्या गाडीखाना या सार्वजनिक आरोग्यकेंद्रातील रुग्णांनी मानकर यांची भेट घेऊन त्यांना निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी होण्याकरिता शुभेच्छा दिल्या. शहरातील मध्यवर्ती भागातील हे सार्वजनिक आरोग्यकेंद्र आहे. आजमितीस येथे अत्यंत अपुर्या स्वरूपात वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्यामुळे येथे येणार्या गरीब रुग्णांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून येथील आरोग्यकेंद्र हे महानगरपालिका प्रशासन व राज्य प्रशासनातर्फे दुर्लक्षित राहिल्यामुळे गरीब रुग्णांना आवश्यक असलेल्या अत्याधुनिक वैद्यकीय सामग्री, कुशल कामगार व निष्णात डॉक्टर्स यांचा मोठ्या प्रमाणात अभाव दिसून येत आहे, त्यामुळे येथील गरीब रुग्णांना नाइलाजाने ससून रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे, त्यामुळे आजमितीस ससून रुग्णालयावर फार मोठ्या प्रमाणात ताण पडत असल्याचे दिसून येते.
दीपक मानकर यांनी मांडली … अलिशान -अत्याधुनिक मंडई आणि आरोग्यकेंद्राची संकल्पना
Date: